वाल्मिक जोशी, जळगाव : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परस्पररित्या राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव RTO कार्यालयात उघडकीस आल्याने राज्यभरात मोठीं खळबळ उडाली होती. ऑनलाईन प्रणालीमधील त्रुटीचा दुरुपयोग करून अन्य व्यक्तीच्या मोबाईलवरून हा सगळा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत होते.
सावकारे यांच्या जागी ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर वापरून हे सर्व करण्यात आले होते. ते जळगाव आर टी ओ कार्यालय परिसरातील एजंट अशोक पाटील आहेत. त्यांनी आपला मोबाईल दुसऱ्याने वापरून आपल्याला अडचणीत आणले असल्याचं आणि आपल्या विरोधात षडयंत्र रचले गेले असल्याचं म्हटल आहे.
या प्रकरणी अशोक पाटील यांच्या म्हण्यानुसार आपला मोबाईल हा पप्पू भोळे नावाच्या एका भुसावळ येथील आर टी ओ एजंट यांनी फोन मागितला होता आणि त्यांनीच आपल्या मोबाईलचा वापर करून संजय सावकारे यांची कार अनिल परब यांच्या नावे करून आपली फसवणूक केल्याचं म्हटलं आहे.
पप्पू भोळे हे आपले नातेवाईक असल्याने आणि आपल्याच शेतात काम करीत असल्याने आपण त्यांच्या वर विश्वास ठेऊन त्यांना मोबाईल दिला होता.
या प्रकऱणी विनाकारण गोवण्यात आले असून आरटीओ अधिकारी गणेश पाटील यांना देखील अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपण या संदर्भात आपली फसवणूक झाली असल्या बाबत पोलिसांनी सांगणार असल्याचं अशोक पाटील यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची गाड़ी चक्क परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
आमदार संजय वामन सावकारे यांच्या मालकीची (MH 19 - CZ 5130 ) टोयोटा कंपनीची गाडी ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही 24 डिसेंबर 2021 रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली होती.
आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी केली गेली. असा सवाल उपस्थित होत होता.