Water Supply : पाणीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईकर आणि नाशिककरांसाठी पाणी संकट उभं ठाकलं आहे. नवी मुंबईत काही शहरांमध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटीमध्ये आज संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (water supply today friday 24hrs water cut kharghar taloja ulwe new mumbai and nashik no water supply panchavati saturday )
सिडकोकडून हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनीवरील देखभाल तसंच दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजामध्ये नळांना पाणी नसणार आहे.
नवी मुंबईसह नाशिकरांवरही पाणी संकट आहे. शनिवारी म्हणजे 16 सप्टेंबरला दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा संपूर्ण दिवस बंद असणार आहे.
पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रातील उपकेंद्र आणि पंप हाऊसमध्ये विद्युतविषयक दुरुस्तीचं कामं हाती घेणं गरजेच असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधील संपूर्ण म्हसरुळ शिवार, प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग क्रमांक सहामधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर आणि प्रभाग क्रमांक तीनमधील हिरावाडी या भागात शनिवारी संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही आहे. तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.