'Virat Kohli' ने आजच्या दिवशी 'Team India' ला बनवले होते वर्ल्ड चॅम्पियन

  टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)हा जगातील यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. तसेच बॅटिंगमध्येही त्याचा कोणी हातधरु शकत नाही. विराटच्या या  रेकॉर्ड्सची ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. त्याच्या या यशाच्या पाठीमागे त्याची 13  वर्षा पूर्वीची मेहनत आणि वर्ल्डकप आहे.

Mar 02, 2021, 23:29 PM IST

मुंबई :  टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)हा जगातील यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. तसेच बॅटिंगमध्येही त्याचा कोणी हातधरु शकत नाही. विराटच्या या  रेकॉर्ड्सची ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. त्याच्या या यशाच्या पाठीमागे त्याची 13  वर्षा पूर्वीची मेहनत आणि वर्ल्डकप आहे.

 

1/5

13 वर्षापूर्वी अंडर-19 टीममध्ये कमाल

13 वर्षापूर्वी अंडर-19 टीममध्ये  कमाल

टीम इंडियाने फाइनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला एका रोमांचक मॅचमध्ये 12 रनांने हरवलं होत. तेव्हाच विराट कोहली इंडियाचा अंडर-19 टीमचा कॅप्टन होता. विराटच्या नेतृत्वाखाली ही मॅच टीम इंडियाने जिंकली होती.  

2/5

सेमीफाइनलमध्ये कोहलीच्या टीमने विलियमसनच्या टीमला दिेल्ली होती टक्कर

 सेमीफाइनलमध्ये कोहलीच्या टीमने विलियमसनच्या टीमला दिेल्ली होती टक्कर

2008 मध्ये अंडर-19 वर्ल्डकपच्या सेमीफाइनलमध्ये भारताच्या विरोधात न्यूझीलँडची टीम होती, तेव्हा विलियमसन हा न्यूझीलँड टीमचा कॅप्टन होता. त्या मॅचमध्ये भारताला जिंकण्यासाठी 43 ओव्हरमध्ये 191 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण टीम इंडियाने मात्र 7 बळी गमावून, 9 बॅाल राखत लक्ष पूर्ण केलं. कोहलीने यामध्ये 43 रनांचे योगदान दिले होते.

3/5

अंडर-19 टीममधील हे 5 खेळाडू टीम इंडियचा भाग

 अंडर-19 टीममधील हे 5 खेळाडू टीम इंडियचा भाग

कोहली सोबतच रविंद्र जडेजा, सिद्धार्थ कौल, मनीष पांडे आणि सौरभ तिवारी हे अंडर-19 मधील खेळाडू  टीम इंडियाचा भाग होते. तर रविंद्र जडेजा हा आजही टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

4/5

विराट-जडेजा ची‘धमाल’

विराट-जडेजा ची‘धमाल’

या मॅचमध्ये विराटने  कर्णधारपदासोबतच त्याच्या फलंदाजीची ही ताकद दाखविली होती. या टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 6 सामन्यात 235 धावा केल्या, त्याचवेळी रवींद्र जडेजा हा भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने या मॅचमध्ये 10 बळी घेतले.  

5/5

कोहलीचे ‘विराट’रेकॉर्ड्स

कोहलीचे ‘विराट’रेकॉर्ड्स

एकदिवसीय मालिकेत तीन शतक मारणारा कोहली हा पहिला कर्णधार आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 22 वर्षानंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. 2015 मध्ये विराट टीमने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. त्याचवेळी 2018-19 मध्ये त्याच्या नेतृत्वात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी मालिकेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 71 वर्षात प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टीम इंडियाने  कसोटी मालिका जिंकली.