सुपरस्टार्सच्या घराण्यातून येणाऱ्या 'या' स्टारकिडचं वयाच्या 44 व्या वर्षी OTT वर पदार्पण, सुंदरतेत करीना-करिश्माला देते टक्कर
इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरस्टार्स असे आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्या ऐवजी दुसऱ्या क्षेत्रात नशिब आजमावलं. त्यापैकी काही स्टार किड्सनं यशाचं शिखर गाठलं आहे तर काही स्टार किड्सला इथे यश मिळालंच नाही. तर आपण अशा एका स्टारकिडविषयी जाणून घेणार आहोत. जिनं इंडस्ट्रीपासून स्वत: ला दूर ठेवलं आणि वयाच्या 44 व्या वर्षी ओटीटीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
Diksha Patil
| Dec 01, 2024, 14:35 PM IST
1/7

तुम्हाला सगळ्यांना अनेक स्टारकिड्स विषयी माहिती आहे. त्यापैकी काही हे लाइमलाईटपासून दूर राहतात. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते चर्चेत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टारकिड विषयी सांगणार आहोत, जिचं संपूर्ण कुटुंब हे इंडस्ट्रीचा भाग आहे आणि तिनं या इंडस्ट्रीचा भाग न होण्याचं ठरवलं. तरी तिची लोकप्रियता ही कोणत्याही सेलिब्रिटीच्या तुलनेत कमी झाली नाही.
2/7

3/7

ही स्टारकिड दुसरी कोणी नसून ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची लेक आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आहे. रिद्धिमा कपूर ही वयाच्या 44 व्या वर्षी देखील फीट आहे. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूरचे फिटनेसचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका मुलीची ती आई आहे पण तिच्याकडे पाहून ते वाटत नाही.
4/7

5/7

6/7
