41 व्या वर्षी आई झाली ही अभिनेत्री, 11 वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर; तरी सुंदरतेत झाली नाही कमी...

चित्रपटसृष्टीत एकाहून एक अशा अभिनेत्री आहेत. ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आजवर एकामागे एक असे हिट चित्रपट दिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार होतो. जिनं चित्रपटसृष्टीत करिअरमध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. त्या अभिनेत्रीची अनेक कलाकारांसोबतची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. पण अचानक लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून लांब गेली. आता ही अभिनेत्री कोण हे जाणून घेऊया...

Diksha Patil | Aug 11, 2024, 18:01 PM IST
1/8

ही अभिनेत्री वयाच्या 41 व्या वर्षी प्रेग्नंट राहिल्यानं चर्चेत आली होती. आज 45 वर्षांची असताना देखील ती तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तर आज आपण तिच्याविषयीच जाणून घेऊया...

2/8

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यांच्या करिअरच्या पीकवर त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर पडद्यापासून लांब गेल्या. 

3/8

आता त्या अभिनेत्रींची आठवण तेव्हाच येते जेव्हा त्यांची गाणी आपण ऐकतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. तर या अभिनेत्रीनं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आहिस्ता' या इंडस्ट्रीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

4/8

ती अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी आहे. तिनं म्यूजिक आल्बमसोबत चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आजही तिचे लाखो चाहते आहेत. समीरानं 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर लवकरच ती चित्रपटांपासून लांब झाली. 

5/8

म्यूजिक आल्बम 'आहिस्ता' नंतर समीरा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या जगजीत सिंग यांच्या 'तेरे आने की जब खबर महके' या आल्बममध्ये दिसली होती. त्यानंतर तिनं 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने दिल तुझको दिया' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

6/8

पहिल्याच चित्रपटातून समीरानं लाखो प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं. समीरानं 'मुसाफिर', 'नो एंट्री', 'वन टू थ्री', 'आक्रोश' आणि 'दे दना दन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिचा अखेरचा चित्रपट हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'चक्रव्‍यूह' होता. तर तिचा अखेरचा दाक्षिणात्य चित्रपट हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेला 'वराधानायाका' आहे. 

7/8

समीरानं 2014 मध्ये बिझनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केलं. ज्याच्यासोबत ती दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये दिसली नाही. वर्षभरानंतर 2015 मध्ये तिचा मुलगा हंसचा जन्म झाला. त्यानंतर 2019 मध्ये तिनं लेक नायराला जन्म दिला. त्यावेळी चर्चा ही समीराच्या वयाची होती. कारण तेव्हा ती 41 वर्षांची होती. 

8/8

समीरा आता 45 वर्षांची आहे. तरी देखील ती तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.