अंबानींच्या अंगणात झाला या अब्जाधीशाच्या वारसाचा विवाह, सून होऊन घरात आली ‘मिस इंडिया’

Aditi-Kotak Wedding Album: लोकप्रिय व्यावसायिक उदय कोटक यांचा मुलगा जय कोटेकनं 2015 च्या मिस इंडिया अदिती आर्यशी लग्न केलं. मुंबईच्या जियो कन्वेंशन सेंटरमध्ये त्यांचं लग्न झालं. अदिती आणि जय या दोघांनी येन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केले. हे दोघं गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. 

Diksha Patil | Nov 10, 2023, 15:45 PM IST
1/7

अंबानी कुटुंब

जय आणि अदितीच्या लग्नात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी देखील हजेरी लावली आहे. 

2/7

बॉलिवूड कलाकार

बॉलिवूड कलाकारांनी देखील जय आणि अदितीच्या लग्नात हजेरी लावली होती. 

3/7

अदिती कुठची आहे?

अदिती ही चंडीगढची असून तिनं गुरुग्राममध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती एक अभिनेत्री, मॉडेल, रिसर्च अॅनालिस्ट आणि ब्यूटी पेजेंट विनर देखील आहे. 

4/7

मिस इंडिया

2015 मध्ये अदितीनं मिस इंडियाचा खिताब जिंकवला होता. 

5/7

येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये केलं शिक्षण

अदिती आर्यनं एमबीएचं शिक्षण येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून केलं. त्याआधी तिनं डिग्रीचं शिक्षण हे शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजचं दिल्ली यूनिव्हर्सिटीतून घेतलं आहे. 

6/7

जय कोटकनं कुठून केलं शिक्षण

जय कोटकनं कोलंबिया यूनिव्हर्सिटीतून इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यानं हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं आहे. सध्या तो कोटक 811 चा उपाध्यक्ष आहे. 

7/7

अदिती आणि जयचा लूक

अदितीनं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, तर जयनं क्रिम रंगाची शेरवानी परिधान केली आहे. (All Photo Credit : Social Media)