90 च्या दशकातील हिट गायिका, लतादीदींशी तुलना; मग गाण्यांपासून का दुरावल्या? पतीच्या निधनानंतर अफेअरच्या उठल्या वावड्या

Entertainment : मुंबईतील मराठी कुटुंबातील या गायिकेने अमिताभ बच्चन आणि जया यांच्या अभिमान या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. पण आज 18 वर्षांपासून त्या गायनाच्या जगापासून दूर आङेत. जाने होगा क्या चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. 

| Oct 27, 2024, 08:49 AM IST
1/7

बॉलिवूडमध्ये केवळ पार्श्वगायन केले नाही तर भजन गायनातही नाव कमावलं. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1952 मध्ये झाला. बॉलिवूड गाणी आणि भजनांव्यतिरिक्त अनुराधा यांनी पंजाबी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलगू, ओरिया आणि नेपाळी भाषांमध्येही गाणी गायली आहेत. 

2/7

एकेकाळी सलग हिट रोमँटिक गाणी देणाऱ्या अनुराधा पौडवाल आता फक्त भक्तिगीते गातात. पार्श्वगायन का सोडलं या प्रश्नावर त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी आता चित्रपटसृष्टीपासून दूर झाले याचं कारण म्हणजे चित्रपटांचं बदललेलं स्वरूप. पूर्वी संगीताभिमुख चित्रपट बनत असत. संगीत हा चित्रपटांचा आत्मा असायचा, पण आता तसं राहिलेलं नाही. आता गाण्यांचे बोल आणि संगीत पूर्वीसारखे गोड राहिलेलं नाही. आता भक्तीगीतांमध्येही तोच आनंद मिळतो.

3/7

अनुराधा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होत्या तेव्हा त्यांनी जाहीर केलं की आता त्या फक्त गुलशन कुमार यांच्या कंपनी टी-सीरीजसाठी गाणार आहे. याचा थेट फायदा अलका याज्ञिक आणि इतर गायकांना झाला. चित्रपट सोडून भक्तिगीते गायला लागल्यानंतर त्यांची कारकीर्द उतरणीला लागली. सुमारे 5 वर्षे अनुराधा यांनी कोणत्याही चित्रपटासाठी किंवा इतर संगीत कंपनीसाठी कोणतेही गाणे गायले नाही.

4/7

अनुराधा यांचा विवाह अरुण पौडवाल यांच्याशी झाला होता. अरुण एसडी बर्मन यांचं सहाय्यक होतं आणि स्वतः संगीतकार देखील होते. त्यांना आदित्य आणि कविता पौडवाल ही दोन मुलं आहेत. अरुण पौडवाल यांच्या अकाली निधनानंतर अनुराधा आणि गुलशन कुमार यांच्यातील बंध वाढलं होतं, असं म्हटलं जातं. अनुराधा यांनी टी-सीरिजसाठी 10 वर्षांहून अधिक काळ काम केलं. त्यानंतर गुलशन कुमार यांची हत्या झाली. 

5/7

अनुराधा पौडवाल यांना आशिकी, दिल है की मानता नहीं आणि बेटा या चित्रपटांसाठी तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पुढच्या लता मंगेशकर म्हटलं जात होतं. एकदा ओपी नय्यर म्हणाले होतं की, लता आता संपली आहे, अनुराधा यांनी त्यांची जागा घेतली आहे. अनुराधा लता मंगेशकर यांची खूप मोठी चाहती आहे. लताजींचे गाणे ऐकूनही त्या गाण्याचा सराव करत असे. हेमा मालिनी आणि शशी कपूर यांचा आप बीती हा त्यांचा त्यांनी एकटीने गायन केलं होतं. 

6/7

अनुराधा भारतीय संगीत खूप छान सादर करायच्या. मात्र, त्यांनी कधीही शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले नाही. अनुराधा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी शास्त्रीय गायनासाठी खूप प्रयत्न केले, पण करू शकले नाही. 

7/7

अनुराधा यांची मुलगी कविता पौडवाल ही देखील गायिका असून तिने अनेक भजने गायली आहेत. मुलगा आदित्य पौडवाल याचं गेल्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.