'मी तर सर्वांना खुश...' लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बोलले TMKUC चे असित मोदी

Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. पण सध्या ही मालिका चर्चेत असण्याचं कारण काही वेगळंच आहे. ही मालिका सध्या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनं केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. अखेर यावर आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी कधीच कोणाविषयी वाईट विचार केला नाही आणि कधी कोणत्या व्यक्तीसोबत वाईट केलं नाही. 

Diksha Patil | Aug 02, 2023, 18:24 PM IST
1/7

असित मोदी

asit modi opens on sexual harassment

असित मोदी यांनी आईएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की 'भावनिकदृष्ट्या मला खूप वाईट वाटलं कारण सगळ्यांना मी कुटुंबासारखं ठेवलं.' 

2/7

कधीच कोणाला दुखावलं नाही

asit modi opens on sexual harassment

'मी कधीच कोणाला चुकीची वागणूक दिली नाही. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करायचो. त्यामुळे मी माझ्या टीममध्ये कधीच कोणाला दुखावलं नाही. सगळ्यांना आनंदी ठेवतो आणि त्यांना एक पॉजिटिव्ह वातावरण देतो', असं असित मोदी म्हणाले. 

3/7

आव्हानांना सामोरे जातात तेच यशस्वी होतात

asit modi opens on sexual harassment

असित मोदी म्हणाले की चांगल काम करताना अडथळे येतातच आणि जे त्यांचा सामना करतात तेच यशस्वी होतात. आम्ही सगळ्या अडथळ्यांचा सामना करू आमच्या अवती-भोवती जे होतय त्याला लढा देतोय आणि ते देखील पॉझिटिव्ह विचार करत.

4/7

अनेक कलाकार स्वत: सोडून गेले

asit modi opens on sexual harassment

अनेक कलाकार त्यांच्या मर्जीनं आम्हाला सोडून गेलेत. त्यांनी ट्रेन मध्येच सोडली आणि त्यांना जायचं त्या रस्त्यानं गेले. पण त्यांनी केलेलं काम मी कधीच विसरणार नाही. मी नेहमीच त्यांची स्तुती करतो आणि आभारी आहे.' 

5/7

असित मोदींनी मागितली माफी

asit modi opens on sexual harassment

असित मोदी म्हणाला, मी कधीच कोणाला चुकीची वागणूक दिली नाही आणि ना कधी कोणाविषयी वाईट विचार केला. पण जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो.

6/7

सगळ्यांविषयी चांगलाच विचार केला

asit modi opens on sexual harassment

या 15 वर्षात सगळ्यांविषयी चांगलाच विचार केला. अनेकांनी गोकुलधामचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही पॉझिटिव्ह विचार केला. हेच कारण आहे की आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. 

7/7

जेनिफर मिस्त्रीनं केले होते आरोप

asit modi opens on sexual harassment

जेनिफर मिस्त्रीनं असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि त्यासोबतच त्यांचे जे काही पैसे होते ते न दिल्याचे आरोप केले आहेत. (All Photo Credit : Social Media)