Bone Health: आजच 'या' 5 वाईट सवयी सोडा, नाहीतर हाडे होतील कमजोर

आजच या 5 वाईट सवयी सोडा, नाहीतर हाडे होतील कमजोर

| Jun 25, 2023, 20:30 PM IST

Bone Health: आजच या 5 वाईट सवयी सोडा, नाहीतर हाडे होतील कमजोर

1/6

Bone Health: आजच या 5 वाईट सवयी सोडा, नाहीतर हाडे होतील कमजोर

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

Bad Habits For Bone Health: आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त होतो की आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्या रोजच्या चुकीच्या आहारामुळे शरीर कमकुवत होऊ लागते आणि किरकोळ काम करूनही शरीरात वेदना सुरू होतात. हाडे कमकुवत होणे यातील एक कारण आहे.  अशावेळी नेमकं चुकतं कुठे हे आपल्याला समजले पाहिजे. 

2/6

शरीराची हालचाल कमी

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

जर तुम्ही शरीराची हालचाल कमी करत असाल किंवा जास्त आळशी असाल तर हाडे कमकुवत होण्याची शक्यता आहे. चालण्याबरोबरच थोडा व्यायाम करत राहणे चांगले, अन्यथा गंभीर परिणाम समोर येऊ शकतात.

3/6

मिठात सोडियमचे प्रमाण खूप

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

जर तुम्हाला खारट जेवणाची आवड असेल तर ही सवय तुमची हाडे कमकुवत करू शकते. मिठात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असल्यास शरीरातून कॅल्शियम कमी होऊ लागते.

4/6

पुरेशी झोप

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

पुरेशी झोप न मिळाल्यास हाडे कमकुवत होतात, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 7 ते 8 तास झोप न घेतल्यास कमकुवत हाडांसह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

5/6

फुफ्फुसांवर वाईट परिणाम

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

धुम्रपानाचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. त्यामुळे हाडेही कमकुवत होतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.

6/6

व्हिटॅमिन डी गरजेचे

Avoid these 5 bad habits today otherwise bones will become weak

शहरांमध्ये अशी अनेक घरे आहेत जिथे सूर्यप्रकाश नीट पोहोचत नाही. सतत घरातून काम करत असाल तर सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात पोहोचणार नाही. त्यामुळे हाडे कमकुवत होतात. मुलांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला नाही तर मुडदूस सारखे आजार होऊ शकतात.