114 कलशांनी श्रीरामाला अभिषेक, रात्रिजागरण अन्..; प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येचे अयोध्येतील Photos

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Events: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याच सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये काही विशेष अनुष्ठान पार पडले. याचसंदर्भातील काही खास फोटो समोर आले आहेत. नेमके कोणते विधी आदल्या दिवशी करण्यात आले, त्याचं महत्तव काय याचसंदर्भात जाणून घेऊयात...

| Jan 22, 2024, 08:17 AM IST
1/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

अयोध्येतील राम मंदिराजवळच्या यज्ञशालेमध्ये प्राणप्रतिष्ठापणेच्या आदल्या दिवशीचे म्हणजेच 21 जानेवारी रोजीचे श्री राम जन्मभूमि तीर्थ श्रेत्रच्या खात्यावरुन शेअर करण्यात आले आहेत.

2/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

श्री रामलला सरकार प्राण प्रतिष्ठा अनुष्ठानमध्ये आज स्थापित देवतांचे दैनिक पूजन हवन, पारायण इत्यादी कार्य, प्रातः मध्वाधिनास, मूर्ति ला 114 कलशांमधील विविध औषधीयुक्त पाण्याने केलेला अभिषेक घालण्यात आला, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

3/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

महापूजा, उत्सवमूर्तिची प्रासादपरिक्रमा, शय्याधिनास, तत्त्वन्यास, महान्यास आदिन्यास, शान्तिक-पौष्टिक - अघोर होम, व्याहृति होम इत्यादी विधीही करण्यात आले.

4/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

तसेच रात्रिजागरण, सायंपूजन आणि आरतीही पार पडल्याचं श्री राम जन्मभूमि तीर्थ श्रेत्रच्या खात्यावरुन सांगण्यात आलं आहे.

5/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

कांची कामकोटि पीठमचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वती महाराज यांनीही रविवारी आज श्री राम जन्मभूमि मंदिर अनुष्ठान यज्ञशालेला भेट दिली.  

6/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वती महाराजांनी प्राण प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

7/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

मागील अनेक दिवसांपासून मंदिर परसिरामध्ये वेगवेगळी धार्मिक कार्य पार पडत असून यज्ञ आणि अनुष्ठान केली जात आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती असून अगदी फुगड्या खेळून त्यांनी मंदिराच्या प्रांगणात आनंदही साजरा केला आहे.

8/8

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Prior Day Events Photos

'जय श्री राम'च्या घोषणा देत फुलांची उधळण करुन भाविक मंदिराच्या प्रांगणात आनंद साजरा करताना दिसत आहेत.