तुम्हालाही वाटते भीती, तर चुकूनही पाहू नका 'हे' 5 दाक्षिणात्य चित्रपट; यांच्यासमोर बॉलिवूड आणि हॉलिवूडही Fail
सध्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. ज्यांनी फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांचे काही बॉलिवूड रीमेक देखील हिट झाले. त्यात 'दृश्यम' आणि 'भूलभुलैया' हे चित्रपट आहेत. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यातील असे काही 5 गाजलेले चित्रपट दिले आहेत. ज्याची क्रेझ फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आहे. हे 5 असे चित्रपट आहेत जे पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आणि नक्कीच घाबराल...



2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीतरंगा' या चित्रपटाची पटकथा ही एका लेखकाच्या अवती-भोवती फिरते. तिला कसे भयानक स्वप्न येतात. या महिलेच्या आयुष्यात ज्या चित्र-विचित्र घटना घडतात. त्याचा संबंध तिच्या मागच्या आयुष्यातील नवऱ्याशी जोडलेला असतो. या चित्रपटाची पटकथा ही पाहून तुम्हाला कळणारच नाही नक्की काय होतंय. तर हा चित्रपट तुम्ही एमएक्स प्लेयरवर पाहू शकता.



2017 मध्ये प्रदर्शित झालेला सस्पेंस थ्रिलर चित्रपट 'मायावन' मध्ये जॅकी श्रॉफनं देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची पटकथा ही एका पोलिस अधिकाऱ्याच्या अवतीभोवती फिरताना दिसते. त्यात तो एक मर्डर मिस्ट्री शोधताना दिसतो. पण हे सगळं एक सीरियल किलरवर अवलंबून असतं. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना आश्चर्य होतं. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकतात.
