मुंबईकरांचा पैसा कुणाच्या बापाचा नाही; आदित्य ठाकरेंच्या आरोपांवरुन प्रविण दरेकर संतापले

बीकेसी मैदानावर पार पडलेल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईकरांना मुंबई महानगर पालिका भाजपच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीलाच मैदानात उतरले आहेत

Jan 21, 2023, 14:38 PM IST
1/6

BMC election

मुंबई महापालिकेवर झेंडा फडवण्याच्या उद्देषाने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असताना याची झलक दाखवून दिली आहे. अशातच माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

2/6

Aditya Thackeray allegations

भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर म्हणजेच महापालिकेतील 80 हजार कोटींच्या एफडीवर डोळा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तर ज्या-ज्या महापालिकेत भाजपची सत्ता होती ती महापालिका तोट्यात असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

3/6

aditya thackeray

भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे, कारण त्यांचा मुंबईकरांच्या पैशांवर म्हणजेच मुंबई महापालिकेच्या 80 हजार कोटींच्या एफडीवर डोळा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले

4/6

Pravin Darekar on Aditya Thackeray

दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईकरांचा पैसा कुणाच्या बापाचा नाही असे प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे

5/6

Pravin Darekar got angry

तुम्ही मुंबईकरांच्या कष्टाचा, घामाचा पैसा 25 वर्षे लुबाडलात त्याचा हिशोब मुंबईकरांना द्यावा लागणार आहे. मुंबईकरांचा पैसा कुणाच्या बापाचा पैसा नाही. तो पैसा मुंबईकरांचा आहे त्यामुळे त्यांच्या विकासासाठी लावला तर त्याचा मुंबईकरांना अभिमान आहे.

6/6

BJP MLA Pravin Darekar

आतापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत मुंबईकरांच्या पैशांवर त्यांचा डोळा होता. मात्र आता तो राहणार नाही याचे त्यांना दुःख आहे. मुंबईकरांशी त्यांचे काही सोयर सुतक नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले.