अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये नॉनस्टॉप मुंबई ते जळगाव! BMW चा भारतात धमाका

BMW कंपनीची Mini Countryman इलेक्ट्रिक कार भारतात लाँच झाली आहे. 

| Jul 24, 2024, 18:53 PM IST

Mini Countryman : MINI India कंपनीने आपली नवी इलेक्ट्रीक कार इंडियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही कार Mini Cooper आणि BMW प्रमाणेच लग्जरीयस आहे. जाणून घेऊया या कारची किंमत आणि फिचर्स...

1/7

ग्लोबल मार्केटमध्ये Mini Countryman कारचे पेट्रोल व्हर्जन लाँच झाले आहे. भारतात मात्र या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्यात आले आहे.  

2/7

Mini Countryman कारची स्टार्टिंग प्राईज  54.90 लाख रुपये इतकी आहे.   

3/7

ही कार 8.6 सेकंदात  ताशी 0 ते 100 किमी इतका स्पीड पकडते. या कारचा टॉप स्पीड ताशी 170 किमी इतका आहे.

4/7

 130kW रॅपिड चार्जरने  ही कार 30 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के सहज होते.  सिंगल चार्जमध्ये 462Km ची रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे.   

5/7

Mini Cooper आणि BMW कारमध्ये मिळाणारे सर्व फिचर्स या कारमध्ये मिळतात. मिनी कंट्रीमन इलेक्ट्रिकमध्ये, कंपनीने 66.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जो BMW iX1 प्रमाणे आहे.  

6/7

या कारचे डिझाईन अतिशय सिंपल आहे. मात्र, यापूर्वी लाँच झालेल्या कारशी तुलना करता  ही कार 60 मिमी जास्त आणि 130 मिमी लांब आहे.  

7/7

Mini Countryman कार ही  Mini Cooper  आणि BMW च्या इलेक्ट्रिक कारचे अपडेटेड व्हर्जन आहे.