Bollywood Weddings 2023: बॉलिवूडचे 'हे' कलाकार पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, लांबलचक यादी

Band Baaja Baaraat, नविन वर्षात बॉलिवूडचे 'हे' कलाकार अडकणार लग्नाच्या बेडीत  

Dec 06, 2022, 18:46 PM IST

Welcome 2023: डिसेंबर महिन्यात अनेक लग्नांची चाहूल सुरु होते. या वर्षी 2023 अवघ्या काही दिवसांवर आहे. हे येणारे वर्ष अनेक बॉलीवूड (Bollywood) जोडप्यांसाठी खूप शुभ असू शकते, त्यांच्यासाठी एक नवीन प्रवास सुरू होऊ शकतो. केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टीसह (Athiya shetty) अनेक जोडपी 2023 साली लग्नबंधनात अडकू शकतात. यादीतली प्रत्येक नावं तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी आहेत. तर ही यादी पाहा...

1/5

Bollywood Weddings 2023, WELCOME 2023, HAPPY NEW YEAR 2023

पहिले नाव आहे क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची गर्लफ्रेंड, अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty). अधिकृतपणे माहिती आलेली नाही, परंतु केएल राहुलने जानेवारीसाठी वैयक्तिक रजा मागितली आहे, ज्यामुळे दोघेही जानेवारी 2023 मध्ये लग्न करू शकतात अशी बातमी समोर येत आहे.  

2/5

Bollywood Weddings 2023, WELCOME 2023, HAPPY NEW YEAR 2023

या फोटोमध्ये निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत (Rakul Preet Singh) पोज देत आहे. जॅकी आणि रकुल बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांच्या नात्याबद्दल मीडियासमोरही आले आहेत. 2023 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

3/5

Bollywood Weddings 2023, WELCOME 2023, HAPPY NEW YEAR 2023

या यादीत 'दबंग' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) नावाचाही समावेश होऊ शकतो. तिने अधिकृतपणे याबद्दल काहीही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री झहीर इक्बालला (Zaheer Iqbal) डेट करत आहे आणि हे जोडपे पुढच्या वर्षी लग्न करू शकतात.  

4/5

Bollywood Weddings 2023, WELCOME 2023, HAPPY NEW YEAR 2023

2023 मध्ये लग्न करू शकणार्‍या बॉलीवूड जोडप्यांच्या यादीत हे नाव नक्कीच समाविष्ट केले जात आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीबद्दल (Kiara Advani) बोलत आहोत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिड आणि कियारा जानेवारी 2023 मध्ये सात फेरे घेऊ शकतात.

5/5

Bollywood Weddings 2023, WELCOME 2023, HAPPY NEW YEAR 2023

या यादीत तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) नावाची तुम्हाला अपेक्षा नसेल. तारा अनेक वर्षांपासून अभिनेता आणि रणबीर कपूरचा चुलत भाऊ आधार जैन याला डेट करत आहे. आधार आणि तारा 2023 मध्ये एकमेकांशी लग्न करू शकतात, अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत.