ISRO च्या यशानं जागतिक नेत्यांसमोर मोदींची कॉलर टाइट! BRICS परिषदेत काय घडलं एकदा पाहाच

BRICS banquet dinner :  चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉलर टाइट झाल्याचा त्या क्षणाचे फोटो समोर आले आहेत. देशोदेशीच्या प्रतिनीधींकडून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या.

Aug 24, 2023, 11:13 AM IST

BRICS banquet dinner : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जोहान्सबर्गमध्ये आहेत. चांद्रयान 3 मोहिमेनंतर जगभरात भारताचं कौतुक होतंय. 

1/13

बुधवारी जोहान्सबर्गमधील ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान डिनर पार्टीमध्ये फक्त चांद्रयान 3 च्या यशाचीची चर्चा होती. ISRO च्या यशानं ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

2/13

 भारताच्या अंतराळ प्रवासात एक मोठी झेप घेतल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं. 

3/13

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी मोदींचं अभिनंदन केलं.

4/13

चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश बनला आहे. 

5/13

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून 14 जुलै अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आलं होतं. 

6/13

त्यानंतर बुधवारी 23 ऑगस्ट 2023 ला भारताने इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. 

7/13

अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं.

8/13

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत जगातील पहिला देश आहे. 

9/13

पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेवरुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांबरोबर लँडिंग पाहिलं आणि इतिहासीक क्षणाचे साक्षीदार झाले.

10/13

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करुन अभिनंदन केलं.   

11/13

भारताच्या यशानंतर सर्वत्र एकच जल्लोष आणि भारतावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. 

12/13

भारतीयांनी टाइम्स स्क्वेअरवर ऐतिहासिक लँडिंगचा आनंद साजरा केला. 

13/13

23 ऑगस्ट 2023 ची तारीख भारत काय तर जग सुद्धा कधी विसरणार नाही.