चहावाल्याने 90 हजाराची बाईक विकत घेतल्यानंतर दिली 60000 रुपयांची पार्टी! DJ, क्रेन अन्...; कारण फारच खास

शिवपुरी या चहावाल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या चहावाल्याने 90 हजाराच्या बाईककरिता 60 हजार रुपयांचा खर्च केला आहे. 

| Oct 16, 2024, 13:35 PM IST

मध्यप्रदेशच्या शिवपुरी चहावाल्याने अनोखा कारनामा केला आहे. ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चहावाल्याने 90 हजार रुपयांच्या लूना बाइक करिता 60 हजार रुपयांचा खर्च केला आहे. महत्त्वाचं म्हणजे चहावाला आपली लूना बाईक नेण्यासाठी शोरुममध्ये क्रेन, घोडा गाडी आणि डिजेसोबत पोहोचला. एवढंच नव्हे तर चहावाल्याने गाडीची पूजा केल्यानंतर ढोल आणि डिजेच्या ठेकावर भरपूर डान्स केला. त्यानंतर स्वतः गाडीवर सवार होऊन लूना बाईक क्रेच्या माध्यमातून घरी नेण्यात आली. 

1/8

मुरारी कुशवाहने मुलांसाठी 90 हजारांची लूना खरेदी करण्यासाठी दुर्गादास राठोड चौकातील शोरुममध्ये गेले होता. येथे लोकांनी पाहिलं की मुरारी लूना बाइक खरेदी करण्यासाठी क्रेन, बग्गी आणि डिजे घेऊन गेला होता. 

2/8

चहावाल्याचा गाडी खरेदी करण्याचा उत्साह नक्कीच वाखाण्याजोगा होता. पुरानी शिवपुरी परिसरात राहणारा मुरारी कुशवाह एक चहाचं दुकान चालवतो. 

3/8

चहावाल्याचा स्वॅग

चहावाल्याचा स्वॅग पाहून आजूबाजूचे लोकंच नव्हे तर शोरुममधील स्टाफ देखील हैराण झाला आहे. मुरारी कुशवाहने 20 हजारांचं डाऊन पेमेंट करुन 90 हजारांची लूना बाइक फायनॅन्सवर खरेदी केली आहे.

4/8

 आता मुरारी यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयांचा हफ्ता भरायचा आहे. पण या सगळ्यासाठी लूना बाइक घरी नेण्यासाठी मुरारीने क्रेन, बग्गी आणि डीजे या सगळ्यावर जवळपास 60 हजार रुपयांचा खर्च केला आहे. 

5/8

का केला एवढा खर्च

मुरारी कुशवाह यांचं म्हणणं आहे की, त्यांचे 2 मुलगे आणि 1 मुलगी आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या आनंदासाठी हे सगळं केल्याचं सांगण्यात येत आहे. मुरारी अतिशय मनमौजी व्यक्ती आहेत. 

6/8

त्यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या मुलीसाठी 12 हजार 500 रुपयांचा नवा मोबाइल खरेदी केला. मोबाइल देखील त्यांनी फायनॅन्सवर खरेदी केला होता. 

7/8

मुरारी चहावाल्याने फोन खरेदी केला तेव्हा देखील डीजे, ढोल आणि बग्गीचा समावेश केला होता. यामध्ये त्यांनी 25 हजार रुपये खर्च केले आहेत. आता 90 हजार लूना बाइककरिता मुरारी चहावालेने 60 हजार रुपये खर्च केले आहेत. 

8/8

कोतवाली पोलीस ठाण्याच्या जवळपास गेल्यावर डिजे वाजवणे बंद केले आणि पोलिसांनी ते जप्त केले. यानंतर डीजे संचालक आणि मुरारी कुशवाह यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.