Chanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत. 

May 30, 2023, 13:28 PM IST

Chanakya Neeti in marathi : संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेली चाणक्य नीती ही प्रत्येकाच्या जीवनासाठी उपयुक्त अशी आहे. राजकारणापासून आर्थिक व्यवहारापर्यंतचे ज्ञान यात देण्यात आले आहे. त्याशिवाय महिला आणि पुरुषांचे अनेक गुपितही यात सांगण्यात आले आहे.  चाणक्याने सांगितले की पुरुषांपेक्षा स्त्रियांना काही इच्छा या खूप जास्त असतात. 

1/7

चाणक्य नीती

पौराणिक काळात आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या पुस्तकात पुरुष आणि महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

2/7

महिला या गोष्टी सांगत नाही

या पुस्तकात त्यांनी महिल्यांबद्दल अशा गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या महिला कोणालाही सांगत नाही. ते कायम आपल्या हृदयात लपवून ठेवतात.  

3/7

महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा

पुरुषांपेक्षा अशा काही इच्छा आहेत ज्या महिलांमध्ये त्यांचा तुलनेत अधिक असतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या गोष्टी कुठल्या आहेत. 

4/7

भूक सर्वाधिक लागते

आचार्य चाणक्या यांच्यानुसार महिलांना पुरुषांच्या तुलनेत भूक दुप्पट लागते. त्या वजन वाढू नयेत म्हणून आजकाल जेवण्यावर नियंत्रणात ठेवतात.   

5/7

लाज

आचार्य चाणक्यांच्या मते पुरुषांपेक्षा स्त्रिया या चौपट अधिक लाजतात. महिला इतक्या लाजतात की त्यांचा मनातील गोष्टी सांगायल्या त्या कितीतरी वेळा विचार करतात. 

6/7

धैर्य

आचार्य चाणक्यनुसार महिला या खूप धैर्यवान असतात. त्या पुरुषांपेक्षा सहापट सर्वाधिक धैर्यशाली असतात. म्हणून स्त्रींना देवी आणि शक्तीचं रुप मानलं गेलं आहे. 

7/7

कामवासना

आचार्य चाणक्य हे सांगतात की, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पटीने जास्त कामवासना असते. मात्र लाजाळूपणा आणि सहनशीलता हेदेखील महिलांमध्ये असल्याने त्या कधी बोलत नाही. त्याशिवाय संस्कार आणि कुटुंबाची जबाबदारी यात त्या गुंतलेल्या असतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)