येळकोट येळकोट जय मल्हार! 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी खंडोबाला घातलं साकडं
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनानंतर भंडा-याची उधळण करण्यात आली.
Shasan Aplya dari Jejuri : जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि राज्याची भरभराट होवू दे असं साकडंच खंडोबाला घालण्यात आले.