सिंगल पिलरवर उभा आहे 8 लेनचा रस्ता, अर्धा प्रवास जमिनीपासून 20 फूट उंचीवर तर बाकीचा जमिनीखाली; सर्वात छोटा एक्सप्रेस एखादा पाहाच

Dwarka Expressway: भारतात रस्त्यांचे मोठे जाळे असून महामार्ग आणि द्रुतगती मार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आपण ज्या एक्स्प्रेसवेबद्दल बोलत आहोत जे बांधण्यासाठी अभियंत्यांनी अप्रतिम डोकं लावलं आहे. देशातील सर्वात लहान एक्स्प्रेस वेने अगदी आयफेल टॉवर आणि बुर्ज खलिफालाही मागे टाकले आहे. 

तेजश्री गायकवाड | Jan 21, 2025, 15:16 PM IST

Dwarka Expressway: भारतात रस्त्यांचे मोठे जाळे असून महामार्ग आणि द्रुतगती मार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आपण ज्या एक्स्प्रेसवेबद्दल बोलत आहोत जे बांधण्यासाठी अभियंत्यांनी अप्रतिम डोकं लावलं आहे. देशातील सर्वात लहान एक्स्प्रेस वेने अगदी आयफेल टॉवर आणि बुर्ज खलिफालाही मागे टाकले आहे. 

1/9

India Shortest Expressway Facts: भारतात खूप सुंदर आणि मोठे रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्ग आहेत आणि याचे जाळे अजूनही वाढत आहेत.  अनेक सुंदर एक्सप्रेसवे आहेत. प्रत्येकाची काही ना काही खासियत आहे. कोणता महामार्ग सर्वात सुंदर आहेत तर काही सर्वात उंच आहेत. काही द्रुतगती मार्गांची रुंदी जास्त तर काहींची वेग मर्यादा जास्त आहे. आज आपण ज्या एक्सप्रेसवेबद्दल बोलत आहोत तो देशातील सर्वात छोटा एक्सप्रेस वे आहे, पण त्याची खासियत म्हणजे त्याने दुबईच्या बुर्ज खलिफा आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर यांना मागे टाकले आहे.  

2/9

देशातील पहिला अर्बन एक्सप्रेसवे द्वारका दिल्ली-गुरुग्राम हा देशातील सर्वात लहान एक्सप्रेसवे आहे. एवढेच नाही तर हा देशातील पहिला एलिव्हेटेड एक्स्प्रेस वे आहे, जो उड्डाणपुलाप्रमाणे वरून प्रवास करवतो.   

3/9

द्वारका द्रुतगती मार्गावर अभियांत्रिकीचे दुर्मिळ आणि अद्वितीय काम बघायला मिळाले. एकाच खांबावर असलेला हा 8-8 लेनचा एक्स्प्रेस वे स्वतःच उत्कृष्ट अभियांत्रिकीचा नमुना आहे.  

4/9

याचा २३ किमीचा भाग एलिवेटेड म्हणजे वरच्या बाजूला आहे  आणि ४ किमी भूगर्भात म्हणजेच बोगद्यात आहे.  म्हणजे उड्डाणपूल आणि बोगद्याच्या आतच वाहने धावतील.  

5/9

द्वारका द्रुतगती मार्गाची लांबी केवळ २९ किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात छोटा एक्सप्रेस वे आहे.  त्यातील 18.9 किलोमीटर गुरुग्राममध्ये आहे, उर्वरित 10.1 किलोमीटर दिल्लीमध्ये आहे.  

6/9

द्वारका द्रुतगती मार्गावर एक जागा अशी आहे जिथे  चार मजले दिसून येतात. म्हणजेच एक रस्ता अंडरपास आहे, त्याच्यावर सर्व्हिस लेन आहे आणि त्यावरून उड्डाणपूल आणि द्वारका द्रुतगती मार्ग जातो. या जागेला मल्टीयुटिलिटी कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे हा भाग गुरुग्रामच्या सेक्टर 82 जवळ आहे.  

7/9

हा एक्स्प्रेस वे अशासाठीही खास आहे कारण त्यावर सर्वात रुंद टोल बूथ बांधण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की द्वारका एक्सप्रेसवेवर 34 टोल बूथ बांधले गेले आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वाधिक आहे. 16 लेन एक्सप्रेसवेवर 34 टोल बूथ आहेत.  

8/9

या एक्स्प्रेस वेवर, कार, जीप आणि व्हॅनसाठी एकेरी मार्गासाठी 105 रुपये आणि दोन्ही मार्गांसाठी 155 रुपये, बस आणि ट्रॅकसाठी एकेरी मार्गासाठी 355 रुपये आणि दोन्ही मार्गांसाठी 535 रुपये टोल आहे.

9/9

या एक्स्प्रेस वेच्या बांधकामात दोन लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला असून, आयफेल टॉवरच्या बांधकामापेक्षा 30 पट अधिक आहे. त्याच वेळी, ते बांधण्यासाठी 20 लाख कम काँक्रीटचा वापर केला जाईल, जो बुर्ज खलिफापेक्षा सहापट जास्त आहे.