थंडीत शरीराला उब देणारी बाजरीची खिचडी; 20 मिनिटांत पोटभरीचा पदार्थ

थंडीच्या दिवसांत शरीराला उब देणारे पदार्थ खावेत, असं म्हणतात. उष्ण पदार्थ या दिवसांत जास्त खाल्ले जातात. 

Mansi kshirsagar | Jan 21, 2025, 14:26 PM IST

थंडीच्या दिवसांत शरीराला उब देणारे पदार्थ खावेत, असं म्हणतात. उष्ण पदार्थ या दिवसांत जास्त खाल्ले जातात. 

1/7

थंडीत शरीराला उब देणारी बाजरीची खिचडी; 20 मिनिटांत पोटभरीचा पदार्थ

marathi recipe make Bajrichi Khichdi for belly fat reduce

बाजरीचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळं या दिवसांत बाजरीची भाकरी खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला बाजरीची खिचडी कशी करायची याची रेसिपी सांगणार आहोत. 

2/7

साहित्य

१ वाटी बाजरी, १/२ वाटी तुरडाळ, १ वाटी तांदूळ, १ चमचा हळद, चवीपुरतं मीठ, २ चमचे मेाहरी, १ चमचा जिरं, २ चमचे बारीक कापलेला लसूण, २ सुक्या लाल मिरच्या

3/7

कृती

बाजरी साधारण 6-7 तास भिजत ठेवा. नंतर बाजरी एका कपडावर पसरवून ठेवा. थोडी वाळल्यानंतर बाजरी मिक्सरमधून फिरवून घ्या. 

4/7

बाजरी भिजत घातल्यानंतर एकाबाजूला तूरडाळ आणि तांदूळ अर्धा तास भिजत घाला. 

5/7

आता एका कुकरमध्ये बाजरी, डाळ आणि तांदुळ एकत्र करा आणि त्याच्या दुप्पट पाणी घालावे. आता त्यात 1 चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून 3-4 शिट्या काढाव्यात. 

6/7

कुकर थंड झाल्यानंतर एका चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करावे. गरज वाटल्यास त्यात थोडं गरम पाणी टाकून पातळ करुन घ्यावी

7/7

एका फोडणीच्या भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, लसूण, लाल मिरचीचे तुकडे घालून खिचडीच्या वरुन फोडणी द्यावी. आता त्यावर तूप खालून खायला घ्या.