स्टुअर्ट ब्रॉडचं नाक तोडणाऱ्या टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाची निवृत्ती

Team India : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जातेय. या दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजांने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दुखापतीमुळे हा वेगवान गोलंदाज भारतासाठी जास्त सामने खेळू शकला नाही.

| Feb 16, 2024, 20:46 PM IST
1/7

भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या दरम्यान टीम इंडियाच्या एका वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

2/7

भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वरुणच्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

3/7

34 वर्षांचा वरुण अ‍ॅरोन 65 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे. यात त्याने 168 विकेट घेतल्या आहेत.  झारखंडकडून खेळणाऱ्या वरुण अ‍ॅरोनने 34 च्या अॅव्हरेजने विकेट घेतल्या आहेत.

4/7

वरुण अ‍ॅरोन टीम इंडियासाठीही क्रिकेट खेळला आहे. वरुण भारतासाठी 9 आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला असून यात त्याच्या नावावर 18 विकेट जमा आहेत.

5/7

तर 9 एकदिवसीय सामन्यात त्याने 11 विकेट घेतल्यात, वरुणने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 216 मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला,

6/7

वेगवान आणि भेदक गोलंदाजीसाठी वरुण प्रसिद्ध होता.पण दुखापती आणि लाइन-लेंथमुळे वरुण टीम इंडियात जास्त काळ टीकू शकला नाही.

7/7

2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात वरुण अ‍ॅरोनच्या एका वेगवान चेंडूने स्टुअर्ट ब्रॉडचं नाक तुटलं होतं. त्याच्या नाकातून रक्त वाहून लागलं. ब्रॉडला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.