एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक

Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात. 

| Oct 27, 2024, 13:03 PM IST
1/7

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणचा जन्म 27 ऑक्टोबर 1984 रोजी गुजरातच्या बडोदरा येथे झाला असून त्याचे वडील हे मस्जिदमध्ये मौलवी होते. इरफानच्या घरची आर्थिक स्थिती सुद्धा बरी नव्हती. इरफानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की लहानपणी तो आणि त्याचा भाऊ युसुफ हे मस्जिदच्या छतावर क्रिकेट खेळायचे. तसेच क्रिकेटच्या सामानासाठी पैसे नसल्याने ते दुकानातून सेकंड हॅन्ड सामना खरेदी करायचे. एकेकाळी पैशांसाठी त्यांनी बाजारात नाड्या सुद्धा विकल्या होत्या.   

2/7

इरफान पठाणचं बालपण हे जरी गरिबीत गेलं असलं तरी क्रिकेटमुळे त्याचं नशीब फळफळलं आणि सध्याच्या घडीला इरफान जवळपास 51 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. इरफानने जानेवारी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र त्यानंतरही त्याची कमाई वाढतंच चालली आहे. 

3/7

माजी ऑल राउंडर इरफान पठाणची कमाई ही मुख्यत्वे कॉमेंट्री, जाहिराती, कोचिंग यामधून होतं असते. इरफानची स्वतःची क्रिकेट अकॅडमी सुद्धा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार इरफान पठाण दरवर्षी 4 कोटींची कमाई करतो.

4/7

इरफान पठाण आयपीएल :

इरफान पठाण आयपीएलमध्ये दिल्ली, पंजाब, चेन्नई, पुणे, गुजरात इत्यादी संघाचा भाग होता. यामधून इरफानने कोट्यवधींची कमाई केली. 

5/7

इरफान पठाण कार :

इरफान पठाणकडे अनेक महागड्या कार असून यात 70 लाखांची Mercedes-Benz A-Class, ३३ लाखांची Toyota Fortuner, 20 लाखांची Mahindra Scorpio अशा गाड्यांचा समावेश आहे. 

6/7

इरफान पठाणचा बंगला :

होम टाऊन गुजरातमध्ये इरफान पठाणचं महालासारखा बंगला असून त्याची किंमत जवळपास 6 कोटी इतकी आहे. तसेच भारतातील इतर शहरांमध्ये इरफान खानच्या प्रॉपर्टी आहेत. 

7/7

इरफान पठाण करिअर :

इरफान पठाणच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा इरफान हा दुसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज आहे. 2006 मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. इरफानने 29 टेस्ट सामन्यात 100 विकेट्स घेतले असून 1105 धावा केल्या. तर 120 वनडेमध्ये 173 विकेट त्याने घेतले असून यात 1544 धावा सुद्धा केल्या. तर टी 20 मध्ये इरफानने 24 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या.