'या' कारणामुळे तिने आई आणि बहिणीची हत्या करुन मृतदेह घरामागे गाडले

Feb 12, 2021, 10:07 AM IST
1/5

प्रेमात आंधळे पिता-पुत्रीचं भयानक पाऊलं

प्रेमात आंधळे पिता-पुत्रीचं भयानक पाऊलं

पोलिसांच्या तपासणीदरम्यान आरोपीच्या घरामागील जमीन खोदली असता तेथून दोन मृतदेह ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक मृतदेह आरोपीच्या पत्नीचा आणि दुसरा त्याची 9 वर्षाच्या मुलीचा होता. आरोपीच्या घरातून पत्नी आणि मुलीची मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर ही भीषण घटना घडवून आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्या व्यक्तीला आणि त्याच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अटक केली. (छायाचित्र सौजन्य- ग्लोबो)  

2/5

आरोपी पिता ने किया अपनी नाबालिग बेटी का शोषण

आरोपी पिता ने किया अपनी नाबालिग बेटी का शोषण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाने आरोपीच्या घराच्या मागे खोदून आई आणि 9 वर्षाची मुलगीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या 34 वर्षीय सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली. आरोपीने आपल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी तिच्या आईचा द्वेष करायची. म्हणूनच तिने आपल्या आई आणि बहिणीला ठार मारण्यात आपल्या सावत्र वडिलांना मदत केली. (फोटो सौजन्य- फेसबुक)

3/5

आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर काय म्हटलं ?

आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर काय म्हटलं ?

ज्या व्यक्तीने आपली पत्नी व इतर मुलगी अल्पवयीन मुलीसमवेत ठार केली त्याचे नाव फॅब्रिसियो अरेना आहे. तो 34 वर्षांचा असून फॅब्रिकिओ अरेनाने पोलिसांकडे हत्येची कबुली दिली आहे. आरोपी फॅब्रिकिओ अरेनाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये भांडणादरम्यान वेळी पत्नीची हत्या केली. (फोटो सौजन्य- फेसबुक)    

4/5

या कारणामुळे निरागस मुलीचा जीव घेतला

या कारणामुळे निरागस मुलीचा जीव घेतला

आरोपी वडील फॅब्रिसियोने एरिनाने सांगितले की, पत्नीच्या हत्याचे एका महिन्यानंतर त्याने 9 वर्षाच्या मुलीला देखील मारलं. कारण ती आईबद्दल सारखं विचारत राहायची. यामुळे ते खूप कंटाळले होते. (फोटो सौजन्य - फेसबुक)  

5/5

अल्पवयीन मुलीने काय म्हटलं ?

अल्पवयीन मुलीने काय म्हटलं ?

डेली मेलच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ती तिच्या आईचा खूप राग करायची. पण आपण त्यांना मारले नसल्याचे ती म्हणाली. (फोटो सौजन्य-फेसबुक)