लग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल

Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात. 

| Nov 29, 2024, 18:52 PM IST
1/8

हिंदू धर्मामध्ये लग्न केल्यावर नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं. मंगळसूत्र नेहमी सोन किंवा चांदी या धातूंपासून बनवण्यात येत. हे दोन्ही धातू महिलांचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. तर मंगळसूत्रातील काळा मणी हा महिलांना राहू, केतू आणि शनीच्या वाईट प्रभावापासून वाचवतो.   

2/8

मंगळसुत्रचा संस्कृतमध्ये 'मांगल्यतंतू' असं म्हटलं जातं. मंगळसूत्र दोऱ्यात किंवा सोन्या चांदीच्या तारांमध्ये काळे मणी गुंफून तयार केलं जात. त्याच्या मध्यभागी दोन वाट्या असतात. 

3/8

यातील एक वाटी सासर तर दुसरी वाटी ही माहेरच्या घराची खूण असते. तर दोन दोरे किंवा तारा या पती-पत्नीचे बंधन असतात. असं मंगळसूत्राचं महत्व सांगितलं जातं. 

4/8

लग्नाच्यावेळी वरपक्षातील एक सुवासिनी ही वधू वरांना पूर्व दिशेला तोंड करून बसवते. सुवासिनी महिला मंगळसूत्रातील दोन वाट्यांमध्ये सौभाग्याचे लक्षणं असलेले हळदी कुंकू भरते.    

5/8

लग्नाच्यावेळी वरपक्षातील एक सुवासिनी ही वधू वरांना पूर्व दिशेला तोंड करून बसवते. सुवासिनी महिला मंगळसूत्रातील दोन वाट्यांमध्ये सौभाग्याचे लक्षणं असलेले हळदी कुंकू भरते.    

6/8

वर हे मंगळसूत्र लग्नाच्यावेळी वधूला उलट घालतो. ज्यामुळे वाट्यांमध्ये भरलेलं हळदी कुंकूची बाजू ही समोर येते. ज्यामुळे लोकांना ही नवीन नवरी आहे किंवा या महिलेचं नुकतंच लग्न झालंय हे कळतं.  मंगळसूत्र हे विवाहित महिलेच्या सौभाग्याचं रक्षा कवच मानलं जातं. 

7/8

नवीन संसाराला किंवा नवरा बायकोच्या नात्याला नजर लागू नये म्हणून मंगळसूत्रामध्ये काळे मणी ओवलेले असतात. लग्नाच्यावेळी उलटं घालण्यात आलेलं मंगळसूत्र लग्नानंतरच्या पहिल्या सणाला किंवा शुभ प्रसंगी पुन्हा नवऱ्याच्याच हाताने सरळ केले जाते.  

8/8

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)