न्युझीलंडला मोठा धक्का, 'हा' मॅचविनर खेळाडू सामन्यातून बाहेर

न्युझीलंड विरुद्ध द. अफ्रिका यांच्यात कसोटी सामने सुरु आहेत, मात्र ऐन सामने सुरु असतानाच न्युझीलंडला मोठा धक्का बसला आहे.  

Feb 08, 2024, 20:04 PM IST
1/7

न्युझीलंडचा क्रिकेटर डेरिल मिचेल हा काही दिवस पुढचे कसोटी सामने खेळू शकणार नसल्याचे सांगितले आहे. मिचेलच्या पायाला गंभीर दुखापत झाली .    

2/7

द. अफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या कसोटी सामन्यातून  मिचेल बाहेर जावं लागल्याने न्युझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.   

3/7

त्याचबरोबर केन विलियम्सन हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे रजेवर आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होणाऱ्या कसोटी सामन्यात विलियम्सन उपस्थित राहणार नाही. 

4/7

क्रिकेटर डेरिल मिचेल हा न्युझीलंड संघाच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्युझीलंडने द. अफ्रिकेचा 281 धावांनी पराभव केला.

5/7

गेल्या सहा सात महिन्यापूर्वी मिचेलच्या पायाला दुखापत झाली होती. तरी सुद्धा पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकात तो न्युझीलंडच्या वतीने खेळला होता.

6/7

मिचेलच्या पायाला झालेली गंभीर दुखापत पाहता, त्याला सध्या आरामाची गरज आहे. असं न्युझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी प्रकृती विषयी सांगीतलं आहे. 

7/7

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरू होणार आहे. तो पर्यंत मिचेलच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ मिळेल असंही त्यांनी सांगितलं आहे.