CV आणि Resume मध्ये काय फरक असतो? 99 टक्के लोकांना अर्थ माहितीच नाही

| Dec 23, 2024, 17:59 PM IST
1/7

CV आणि Resume मध्ये काय फरक असतो? 99 टक्के लोकांना अर्थ माहितीच नाही

difference between CV and Resume 90% people make mistakes

नोकरीसाठी अर्ज करत असताना सर्वात पहिले रिझ्युमे किंवा सिव्ही अपडेट करतात. कारण यातून तुमचं व्यक्तीमत्व आणि कामाचे स्वरुप समजत असते. पण तुम्हाला CV आणि  Resume यातील अंतर माहितीये का? 

2/7

CV आणि  Resume याचा काय वेगळा अर्थ होतो. या दोन्हींमध्ये नेमका काय अर्थ आहे. हे जाणून घेऊया. आजकाल प्रोफेशनल आयुष्यात या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. 

3/7

CV आणि  Resume म्हणजे एकच असावेत असा काहींचा समज होते. मात्र या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

4/7

न्यू हॅम्पशायर विद्यापीठातील व्यवसाय व करिअर सल्लागार रिच ग्रँट यांच्या मते, रेझ्युमे हा एक दस्तऐवज आहे जो 1-2 पानांचा असतो. यामध्ये अर्जदाराचा व्यावसायिक अनुभव आणि कौशल्ये याबाबत थोडक्यात नमूद केलेले असते. हा एक छोटा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मागील काम किंवा अनुभवांबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते.

5/7

रेझ्युमेमध्ये, तुम्ही सध्या कुठे काम करत आहात काम किंवा सध्या करत असलेल्या नोकरीशी संबंधित माहितीवर अधिक लक्ष दिले जाते. यामध्ये सध्याचे अनुभव आणि कौशल्ये यांचा तपशीलवार उल्लेख केला जातो, तर जुन्या अनुभवांवर फारसा भर दिला जात नाही.

6/7

 CV चा फुल्लफॉर्म curriculum vitae असा होतो. रिझ्युमेपेक्षा हा प्रकार पूर्णपणे वेगळा असतो. व्यक्तीने त्याच्या व्यावसायिक जीवनातील सर्व पैलू जसे की शिक्षण, कार्य अनुभव, संशोधन आणि इतर यशांबद्दल तपशीलवार लिहावे लागते.

7/7

सीव्ही 10 पानांपर्यंत मोठा असू शकतो आणि त्यात मूलभूत माहिती व्यतिरिक्त, रेझ्युमे, संशोधन, सादरीकरणे, प्रकाशने आणि शिकवण्याचा अनुभव यासारख्या तपशीलांचा समावेश असू शकतो. याशिवाय तांत्रिक अनुभवही तपशीलवार सांगितला आहे. सीव्ही आणि रेझ्युमेमध्ये खूप फरक आहे.