4 दिवसांवर लग्न आलेलं असताना अभिनेत्री प्रेग्नंट? फोटोमुळे एकच चर्चा

'बिग बॉस ओटीटी' ची विनर दिव्या अग्रवाल ही लग्न बंधनात अडकणार आहे. तिनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. दिव्याच्या लग्नाचा वेडिंग वेन्यू पासून सगळी माहिती तिनं दिली आहे. तिच्या पोस्टवरून त्यांच्या लग्नाची नाही तर दुसऱ्याच गोष्टीची चर्चा सुरु झाली आहे.   

Diksha Patil | Feb 16, 2024, 17:01 PM IST
1/7

दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पडगावकर

वरुण सूदशी ब्रेकअप केल्यानंतर दिव्या बिझनेसमॅन अपूर्वसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. तर अपूर्वनं काही काळात थेट दिव्याला लग्नासाठी विचारलं. अखेर आता ते लग्न बंधनात अडकणार आहे. 

2/7

नुकतीच केली घोषणा

दिव्या अग्रवालनं व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि अपूर्वचा फोटो शेअर करत ही बातमी दिली. 

3/7

दिव्या अग्रवालचा लूक

या फोटोंमध्ये दिव्या अग्रवालनं काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर तिचा होणारा नवरा अपूर्वनं पांढऱ्या रंगाचा शर्ट दाखवला आहे. 

4/7

प्रेग्नंसीची चर्चा

दिव्यानं शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट आहे का असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. 

5/7

काय म्हणाले नेटकरी?

दिव्याच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकरी म्हणताय. 'दिव्या तू प्रेग्नंट आहेस?' दुसरा म्हणाला, 'बंपतर आतापासून दिसतोय.' तिसरा म्हणाला, 'प्रेग्नंट राहिल्या की लग्न करतात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'काही महिन्यांनंतर दिव्या म्हणेल आम्ही कुटुंबाची सुरुवात करतोय.'

6/7

कसा आहे लग्नाचा कार्यक्रम?

'ईटाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत दिव्यानं सांगितलं की 20 फेब्रुवारी रोजी लग्न होणार आहे. 18 तारखेला सगळ्या कार्यक्रमांच्या तयारीला सुरुवात होईल. 19 मेहंदी असेल तर 20 ला संध्याकाळी लग्न असेल. 

7/7

कुठे होणार लग्न?

दिव्यानं खुलासा केला की ती चेंबूरला लग्न करणार आहे. तरी घरीच लग्न करण्याचा त्यांच्या या निर्णयाचा त्यांना खूप आनंद आहे. सगळे जे करत आहेत तसं तिला करायचं नाही असं तिनं सांगितलं. (All Photo Credit : Divya Agarwal Instagram)