ओपन बूक एक्झाम म्हणजे काय? CBSE बोर्डाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी किती फायदेशीर

CBSE Open Book Exam : CBSE बोर्डाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. CBSE बोर्डानं परीक्षेसाठी नवा नियम केला असून यात विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाठ्यपुस्तकांचा वापर करता येणार आहे. 

| Feb 23, 2024, 21:00 PM IST
1/7

2/7

त्यानुसार नववी आणि दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इयत्ता अकरावी-बारावीच्या इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र विषयाची ओपन बुक टेस्ट घेतली जाणार आहे. 

3/7

या नियमानुसार परीक्षेला विद्यार्थी पाठ्यपुस्तक आणि नोट्स सोबत नेऊ शकतात. पुस्तकं पाहून विद्यार्थी प्रश्नाची उत्तरं लिहू शकतात

4/7

यानिमित्तानं विद्यार्थ्यांची विचार करण्याची, आकलनाची आणि विश्लेषणाची क्षमता तपासली जाणाराय. या नव्या नियमाची अमलबजावणी करण्याआधी CBSE बोर्डानं दिल्ली विश्वविद्यापीठाकडून मत मागवलंय.   

5/7

ओपन बुक परीक्षा पद्धती खरंच प्रभावी ठरू शकेल का, याची चाचपणी या माध्यमातून केली जाणाराय. यामुळं विद्यार्थ्यांवरील आणि पर्यायानं पालकांवरील परीक्षेचा ताण काहीसा कमी होईल अशी शक्यता आहे. 

6/7

ओपन बूक एक्झाम दोन पद्धतीने आयोजित केली जाते. विद्यार्थी शाळेच्या कॅम्पसमध्ये बसून परीक्षा देऊ शकतात. यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाईल. विद्यार्थी पाठ्यपुस्तक किंवा नोट्स घेऊन बसू शकतात.

7/7

ओपन बूक एक्झामचा दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन परीक्षा. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर सेट पाठवला जातो. शाळेच्या पोर्टलवर जाऊन विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. यादरम्यानही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक किंवा नोट्सची मदत घेता येणार आहे.