परिणीती आणि रावघ चड्ढा यांच्या लग्नाची तारीख ठरली, या ठिकाणी होणार शाही विवाहसोहळा

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding :  परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 18 मे रोजी परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडला होता. दिल्लीतल्या कपूरथाला हाऊसमध्ये हा सोहळा झाला. त्यानंतर ते लग्न करणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 

राजीव कासले | Sep 05, 2023, 21:47 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढ यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आता त्यांच्या लग्नाबाबत नवी माहिती समोर आली आहे.

2/7

परिणीती आणि राघव याच महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे. येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला हॉटेल लीला पॅलेस आणि उदय विलासमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 

3/7

लग्न सोहळ्यात जवळपास 200 पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यात 50 हून अधिक VVIP गेस्ट असतील. या सर्वांच्या राहाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

4/7

या दोन हॉटेल्सव्यतिरिक्त जवळपासची आणखी तीन हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिकाऱ्यांनी नुकतच या हॉटेलचं निरीक्षण केलं. 

5/7

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. 

6/7

मिळालेल्या माहितीनुसार 23 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हळद-मेंहदी आणि संगीत समारोह पार पडेल. तर लग्नानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. 

7/7

2 महिन्याआधी राघव आणि परिणीती यांनी स्वत: उदयपूर इथं येऊन हॉटेल आणि लोकेशनची पाहणी केली. फरीदाबादच्या एसपींनी देखील तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.