मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन का होणार चौकशी?
मालदीवमध्ये 14 सप्टेंबरला मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन वादाच्या भोव-यात सापडलीय. तिच्या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारनं दिले आहेत.
Miss Universe Pakistan Erica Robin : पाकिस्तानी मॉडेल एरिका रॉबिन हिनं मिस युनिव्हर्स पाकिस्तान ही स्पर्धा जिंकलीय. ती आता जगात प्रतिष्ठित असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणार आहे. खरं तर पाकिस्तानसाठी ही अभिमनाची बाब म्हणायला हवी. मात्र घडलं भलतच. एरिकाचं कौतुक करण्याऐवजी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी तिची चौकशी लावली आहे.


