Yoga tips: परीक्षेचे टेंशन? रोज न चुकता करा 'ही' योगासनं
आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की परीक्षांचे टेंशन दूर कसे करायचे? पण चिंता करू नका काही योगासनं ही तुम्हाला चांगलीच फायदेशीर ठरतील. तेव्हा विद्यार्थ्यांनो, आजपासूनच 'ही' योगासनं करायला सुरूवात करा.
इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिना आला की पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात धस्सं व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला परीक्षेची सर्वातोपरी काळजी घेणे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आवश्यक असते. त्यातून परीक्षेचा ताण विद्यार्थांना वाटू नये यासाठीही तितकीच खबरदारी घेणे पालकांसाठी आवश्यक असते. अशावेळी काही विद्यार्थी हे परीक्षेचं खूपच ताण घेतात आणि त्या तणावामुळे परीक्षेच्या वेळी विद्यार्थी खूपच घाबरतात. परंतु परीक्षेचा ताण जास्त घेऊ नका कारण त्यानं तुम्हाला खूपच त्रास होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणजे योगासनं करा.