भूमिपूजनापूर्वी सजली अयोध्यानगरी...

राम मंदिर भूमिपूजनाआधी अयोध्येत संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. उद्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत.

Aug 04, 2020, 16:05 PM IST

अयोध्येतील भूमिपूजनाचा हा सोहळा भव्य करण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. आयोध्येतील भितींवर विविध चित्रांनी रंगरंगोटी करण्यापासून ते अनेक मूर्ती तयार करण्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण झालं आहे. 

 

1/13

अयोध्येत प्रवेश करताना आमंत्रितांच्या स्वागतासाठी मोठा गेट तयार करण्यात आला आहे. 

2/13

अयोध्येतील राम पैडी घाटावरही संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

3/13

अयोध्येतील भिंतींवर विविध चित्र काढण्यात आली आहेत. 

4/13

राम पैडीवर रंग-बेरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

5/13

अयोध्येतील भिंतींवर श्रीरामाच्या जीवनावर आधारित अनेक घटनांची चित्र काढण्यात आली आहेत.

6/13

भूमिपूजनाआधी अयोध्येत विविध ठिकाणी भजन-किर्तन करण्यात येत आहेत. सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे.

7/13

रावणाशिवाय अनेक राक्षसांचे पुतळे तयार करण्यात आले आहेत

8/13

भगवान विष्णू यांचं वाहन असणाऱ्या गरुड देवाची मूर्तीही भूमिपूजनापूर्वी बनवण्यात आली आहे.

9/13

मंगळवारी हनुमान गढी येथे निशाण पूजन करण्यात आलं. श्री हनुमानाची मूर्तीही तयार करण्यात आली आहे.

10/13

कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करण्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. येथे गणपती बाप्पाची मूर्तीही बनवण्यात आली आहे.

11/13

अयोध्येतील भिंतीवरील सुंदर चित्र...

12/13

रावणाचा पुतळा...

13/13

सिंहासनावर बसलेली प्रभु श्री राम-सितेची मूर्ती... (सर्व फोटो सौजन्य : प्रमोद पाराशर)