Lal Kitab: आर्थिक अडचणीत आहात! लाल किताबमधील 'हे' चमत्कारीक तोडगे वापरा

Lal Kitab Upay: वैदिक ज्योतिषशास्त्रात जीवनातील समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे लाल किताबमध्ये तोडगे देण्यात आले आहेत.  त्यामुळे आर्थिक चणचण दूर होते. लाल किताबमधील उपाय कुंडलीतील ग्रह दोष दूर करतात आणि जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग दर्शवते. चला जाणून घेऊयात

Nov 27, 2022, 13:21 PM IST
1/5

lal kitab upay

उत्पन्न वाढवण्यासाठी लाल किताबमध्ये उपाय देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 7 कवड्यांची पूजा करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. पैशाची आवक झपाट्याने वाढेल.

2/5

lal kitab upay

व्यवसायाला गती देण्यासाठी लाल किताबमध्ये उपाय दिला आहे. नारळाला मोली बांधून लाल कपड्यात ठेवा. दुकान किंवा कारखान्याच्या एखाद्या कोपऱ्यात थोड्या उंचीवर ठेवा. 43 दिवसांनी नदीत सोडून द्या.

3/5

lal kitab upay

करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी लाल किताबमध्ये उपाय दिले आहेत. कुत्र्याला भाकरी आणि गायीला पीठ खाऊ घाला. तसेच शुक्रवारी मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला. 

4/5

lal kitab upay

अनावश्यक खर्च थांबवण्याचे लाल किताबमध्ये प्रभावी उपाय दिला आहे. घरात पैसा टिकत नसेल हा तोडगा कामी येईल. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात लाल चंदन मिसळलेले पाणी ठेवा. हे पाणी सकाळी तुळशीच्या रोपाला अर्पण करावे. घरातील पैसा खर्च होणार नाही.

5/5

lal kitab upay

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लाल किताबमध्ये उपाय दिला आहे. 21 शुक्रवार 2 ते 9 वर्षे वयोगटातील मुलींना खीर खायला द्या. शुक्रवारी दुधापासून बनवलेल्या मिठाईचे दान केल्यास खूप फायदा होतो. माता लक्ष्मी प्रसन्न राहून खूप सुख समृद्धी देते.