AMT ते DCT पर्यंत चार पद्धतीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जाणून घ्या कोणता पर्याय बेस्ट

भारतीय बाजारात गाड्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लोकं त्यांच्या गरजा आणि किंमतीनुसार गाड्यांची निवड करतात. या विभागत अनेक प्रकारचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. भारतात प्रामुख्याने 4 प्रकारचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत. यात AMT, CVT, DCT आणि टॉर्क कन्व्हर्टर यांचा समावेश आहे.

Dec 04, 2022, 13:26 PM IST
1/5

automatic gearbox

Automatic transmission in cars: भारतात मॅन्युअलसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची मागणी कारप्रेमींमध्ये वाढली आहे. कमी बजेटच्या वाहनांमध्येही कंपन्यांना ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय सध्या मिळत आहे.  भारतात प्रामुख्याने 4 प्रकारचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत. यात AMT, CVT, DCT आणि टॉर्क कन्व्हर्टर यांचा समावेश आहे. त्यांच्यात काय फरक आहे ते जाणून घेऊयात.

2/5

automatic gearbox

1. AMT (ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन): AMT म्हणजे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन. हा स्वयंचलित ट्रान्समिशनचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. हे मॅन्युअल गिअरबॉक्ससारखे कार्य करते. क्लच आणि गीअर शिफ्टिंग अॅक्ट्युएटरद्वारे नियंत्रित केले जाते. या गाडीची किंमत मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा 50-60 हजार रुपये जास्त आहे. इतर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेससारखे स्मूद नसते. म्हणूनच कधीकधी गियर शिफ्ट करताना धक्का जाणवू शकतो. मारुती अल्टो, बलेनो, टाटा टियागो, टाटा नेक्सॉन सारख्या कारमध्ये याचा वापर केला जात आहे.

3/5

automatic gearbox

2. Torqe Converter: ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची ही जुनी पद्धत आहे. हे गीअर्स बदलण्यासाठी क्लचऐवजी हायड्रॉलिक फ्लुइड कपलिंग वापरते. हे अतिशय सहज ड्रायव्हिंग अनुभव देते. हा सेटअप आकाराने खूप मोठा आहे आणि त्याची देखभाल देखील तितकीच आहे.

4/5

automatic gearbox

3. CVT (कंटीन्यूसली व्हेरिएबल ट्रान्समिशन): या ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे यात गिअर्स नसतात. यात एक पट्टा असतो जो वेगवेगळ्या आकाराच्या दोन पुलींना जोडलेला असतो. पुलीचे एक टोक इंजिन क्रँकशाफ्टला आणि दुसरे टोक व्हील शाफ्टला जोडलेले असते. मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा याची किंमत 1 लाख ते 1.30 लाख रुपये जास्त आहे.

5/5

automatic gearbox

4. DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन): हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ड्युअल क्लचसह येते, यामुळे वेगवान गियर शिफ्टिंग मिळते. त्यांची कार्य करण्याची पद्धत AMT गिअरबॉक्स सारखीच आहे. तथापि, यात एका ऐवजी दोन सब ट्रान्समिशन असतात. एक क्लच विषम क्रमांकित गीअर्स (1,3,5,7)  आणि दुसरा क्लच सम क्रमांकित गीअर्स (2,4,6) साठी ऑपरेट करतो. यामुळे गीअर्स वेगाने बदलतात. मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा याची किंमत 1 लाख ते 1.50 लाख रुपये जास्त आहे.