GANESH UTSAV 2023 : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.  

Sep 27, 2023, 16:32 PM IST

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

1/11

अंधेरीचा विघ्नहर्ता

मुंबई उपनगरात अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ख्याती पावलेला बाळगोपाळ मित्र मंडळाचा गणेशोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोव्हिडंनंतर पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरताना मंडळाने यंदा सुमारे २२ फुटांची कागदी गणेशमूर्ती स्थापन केली आहे.

2/11

शिवशंभू मित्र मंडळ, नेवाडे

दरवर्षप्रमाणेच, या वर्षी देखील गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. नेवाडे गावातील गणेशोत्सव सांगायचे झाले तर बाप्पा 11 दिवसांचा पाहुणा असतो. या 11 दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम होतात, जसे की लहान मुलांसाठी स्पर्धा, भजन, आणि धार्मिक गाणी. असे आयोजन केले आहे.   

3/11

साई मित्र मंडळ, पिंपळे सौदागर

 साई मित्र मंडळ यांनी बाप्पासाठी लाईटचे आरास केले आहे, या सोनेरी मंडपाच्या प्रतिकृतीत बाप्पाचे स्वरूप अगदी सुंदर दिसून येत आहे. तसेच मंडळाने  लहान मुलांनसाठी चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा ,महापुरुषाविषयी माहिती अश्या स्पर्धा आयोजित केले आहे.   

4/11

नवयुवक मित्र मंडळ, लक्ष्मीबेन छेडा नगर, नालासोपारा

नवयुवक मित्र मंडळ यांचे काचेपासून साकारण्यात आलेली श्री गणेश प्रतिमा दिसायला अगदी भव्य आणि विलक्षणीय आहे. या भव्य सजावटीची थीम चांद्रयान थ्री पासून घेतली असून सजावट अगदी मनमोहक आहे.     

5/11

बाल गोपाळ गणेश मित्र मंडळ, काळेवाडी

काळेवाडी मधील बाल गोपाळ गणेश मित्र मंडळ यांनी यंदा वेगळ्या प्रकारचे देखावे बनवत हिमालयाची प्रतिकृती सादर केली आहे .   

6/11

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, चिंचोली सिन्नर.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान  मंडळ यांनी यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन हे आकाशातील चंद्रकोर आणि सुंदर ताऱ्याने केले आहे.    

7/11

मौर्या गणेश मंडळ, हिंगोली

गणेश भक्तांसाठी  मौर्या गणेश मंडळाचे सुंदर आणि विकक्षणीय देखावा केला आहे. 

8/11

गणराज तरूण गणेश मित्र मंडळ, इंदिरानगर तडवळे

गणराज तरूण गणेश मित्र मंडळ यांची गणेश  मूर्ती अगदी सुंदर आणि विलक्षणीय आहे. तर या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही मंडळाला भेट देऊ शकता.   

9/11

श्री दत्त गणेश प्रतिष्ठान मंडळ, कुर्डुवाडी सोलापूर

आपल्याला भेटायला थार गाडी वर आले बाप्पा, श्री दत्त गणेश प्रतिष्ठान मंडळाने वेगळ्या पद्धतीने केले  लाडक्या बाप्पाचे आगमन. 

10/11

मुंबई मेदार (बुरुड) उत्सव मंडळ

यंदा  मेदारचा राजा  गणेशोत्सवाचे ५८ वे वर्ष साजरे करत आहे, मात्र आपल्या बाप्पाची गणेश प्रतिमा अगदी सुंदर आहे. फुलांचा वापर करून मंडप आणि मूर्ती सजवली आहे. ज्यामुळे एक अनोखा आणि लक्षवेधी आरास तयार झाला आहे . 

11/11

टर्नर सेनेटोरियम तेलुगु गणेशोत्सव मंडळ, भोईवाडा मुंबई

या वर्षी मंडळाचे गणेशोत्सव वर्षाचा 50 वे आहे, तर या निमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला आहे. तर या भव्य  दर्शनासाठी तुम्ही बाप्पाला भेट द्या.