Hanuman Jayanti 2023 : बजरंगबलीची 'या' राशींवर असेल विशेष कृपा, बिघडलेली कामं होतील यशस्वी

Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 म्हणजे हनुमान जयंती...या विशेष दिवशी बजरंगबलीची कोणत्या राशींवर कृपा होणार आहे, याबद्दल ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. हनुमान यांची 4 राशींवर विशेष कृपा असणार आहे.   

श्वेता चव्हाण | Apr 06, 2023, 07:39 AM IST

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंती, बजरंगबलीच्या भक्तीचा सण...देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातोय. श्रीरामाचे भक्त, पवनपुत्र, सकंटमोचन आणि शंकराचा 11वा अवतार...हनुमानजींना प्रसन्न करणं हे इतर देवांपेक्षा फार सोपे आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी बजरंगबलीची पूजा करुन प्रसन्न केलं जातं. असं म्हणतात हनुमानजीची मनोभावे आराधना केली तर आयुष्यातील सर्व संकट नाहीसे होतात. घरात सुख समृद्धी नांदते.  

 

1/5

हनुमान जयंती 2023 'या 'राशींची लोकांना धनलाभ (Hanuman Jayanti 2023 Lucky Zodiac Sign)

हिंदू धर्मात संकटमोचनला शक्तींचा स्वामी म्हटलं गेलं आहे. त्यामुळे बाल हनुमानाची पूजा केल्यास वैभव, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि सुखाची प्राप्ती होते, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात. हनुमान जयंतीला विशेष योग तयार होतं आहे. त्यामुळे या दिवशी काही राशींवर हनुमानजीची विशेष कृपा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशींवर बसरणार बजरंगबलीची कृपा...जाणून घ्या तुमच्या राशीचा यात समावेश आहे का ते...

2/5

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय शुभ असणार आहे. तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. अपूर्ण राहिलेली कामं मार्गी लागणार आहेत. तुम्हाला आर्थिक लाभ होईल असं ज्योतिष शास्त्र अभ्यास सांगतात. मात्र तुमचं ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावं लागेल. खरं तर एप्रिल महिना या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

3/5

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंती संकट दूर करणारी ठरणार आहे. कारण या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला संकटमोचनची पूजा केल्या शनि महादशाचा अशुभ प्रभाव कमी होतो. तो कमी झाल्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही चमकणार आहात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, असं ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

4/5

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी ही हनुमान जयंती खूप भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक कमाईचे स्त्रोत्राचे अनेक मार्ग दिसणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला दिली जाणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे आणि त्याची तुम्हाला साथ मिळणार आहे. खरं तर एप्रिल महिना या राशीसाठी लकी ठरणार आहे. 

5/5

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंती खूप जास्त लाभदायक ठरणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. संकटमोचनची या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे जीवनात आनंदाचं वातावरण असणार आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेला मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.      (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)