प्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, एकेकाळी 18 रुपये खिशात असणारा 'हा' अभिनेता इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक

Entertainment News : या अभिनेत्याकडे एकेकाळी जेवणासाठीही पैसे नव्हते आज कोटीच्या संपत्तीचा मालक आहे. कोण आहे 'हा' अभिनेता 

नेहा चौधरी | Aug 31, 2024, 10:29 AM IST
1/7

बॉलिवूडविश्वात दररोज कोणा ना कोणाचा वाढदिवस असतो. आज देखील एका अभिनेत्याचा वाढदिवस असून बॉलिवू़डमधील सक्सेसफुल अभिनेत्यांमध्ये याचे नाव घेतलं जातं. या अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी खूपचं वेगळी आहे. एकेकाळी प्रेमासाठी त्याने 25 मुलांचा मार खाल्ला होता आणि आज लाखो तरूणी त्याच्यावर मरतात.

2/7

आम्ही बोलत आहोत, बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव 31 ऑगस्टला 40 वर्षांचा झालाय. बॉलिवूडमध्ये एक दशकाहून अधिक काळ प्रवास करणाऱ्या राजकुमारने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीय. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगतो की राजकुमार यांच्याकडे किती मालमत्ता आहे.

3/7

राजकुमार राव यांचा जन्म 31 ऑगस्ट 1984 रोजी हरियाणातील गुरुग्राम इथे झाला. त्याला लहाणपणापासून अभिनेता बनायचे होते. त्यानं त्याचं हे स्वप्न कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना पूर्ण केलं.

4/7

राजकुमार यांचं खरं नाव फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचं खरं नाव राजकुमार यादव आहे. पत्रकार शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'राव ही उपाधी यादवांना दिली जाते, म्हणून मी ते वापरायला सुरुवात केली.' सध्या राजकुमार राव आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2' द्वारे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. 

5/7

राजकुमार रावने 'लव्ह, सेक्स और धोखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांचा हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. राजकुमार रावला पहिल्यांदा प्रसिद्धी 2013 मध्ये आलेल्या 'काय पो चे' चित्रपटातून मिळाली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही यात काम केले होते. यानंतर राजकुमारने मागे वळून पाहिले नाही.

6/7

राजकुमार राव यांनी एकदा त्यांच्या बालपणीच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, 'मी गुडगावमधील मॉडर्न फॅन्सी ब्लू बेल्स स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेलो होतो. त्याच शाळेत मी एक मुलगी बास्केटबॉल खेळताना पाहिली. मग आम्ही दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली पण त्या मुलीचा आधीच एक बॉयफ्रेंड होता. जेव्हा त्या मुलीच्या प्रियकराला समजले की मी तिच्या मैत्रिणीला डेट करत आहे, तेव्हा तो मला मारण्यासाठी 25 जाट मुलांसोबत आला होता. या मुलांकडून मी खुप मार खाल्ला असल्याचे तो सांगतोय.  

7/7

बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यापूर्वी राजकुमारला खूप पापड बनवावे लागले. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राजकुमार राव यांनी असा काळही पाहिला जेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त 18 रुपये होते. मात्र आज ते करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, राजकुमारची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कलाकार एका चित्रपटासाठी सुमारे 6 कोटी रुपये घेतात.