निरोगी आयुष्यासाठी आठवड्यातले किती दिवस व्यायाम महत्वाचा? जाणून घ्या

How to stay fit: व्यायाम करण्याची इच्छाशक्ती असल्‍यास शरिरावर चांगले परिणाम दिसतील, असे या निष्कर्षांमध्‍ये दिसून आले. हा अभ्यास मानवी शरीर व्यायामाला कसा प्रतिसाद देतो हे समजून घेण्यास मदत करू शकतो.

Pravin Dabholkar | Sep 05, 2023, 12:12 PM IST

How to stay fit: ऑफिसच्या वेळा, प्रवासाची धावपळ यामुळे आपल्याला नियमित व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तुम्हाला आधीच कोणता ना कोणता आजार असेल तर व्यायामाच्या दिनचर्येचे पालन करून त्यापासूनही सुटका मिळू शकते. 

1/8

निरोगी आयुष्यासाठी आठवड्यातले किती दिवस, कोणता व्यायाम महत्वाचा? जाणून घ्या

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

How to stay fit: निरोगी जीवनशैली ठेवायची असेल रोगांना जवळही येऊ द्यायचे नसेल तर नियमित व्यायाम गरजेचा आहे.  पण ऑफिसच्या वेळा, प्रवासाची धावपळ यामुळे आपल्याला नियमित व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तुम्हाला आधीच कोणता ना कोणता आजार असेल तर व्यायामाच्या दिनचर्येचे पालन करून त्यापासूनही सुटका मिळू शकते. 

2/8

सर्व्हेक्षणातून माहीती समोर

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून किमान किती दिवस व्यायाम करायला हवा? हे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. आठवड्यातून किती दिवस व्यायाम केल्यास चांगले परिणाम दिसतील याबद्दलही या सर्व्हेत सांगण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/8

शरीरावर चांगले परिणाम

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

आठवड्यातून 3 पेक्षा अधिक दिवस व्यायाम करण्याची इच्छाशक्ती असल्‍यास शरिरावर चांगले परिणाम दिसतील, असे या निष्कर्षांमध्‍ये दिसून आले. हा अभ्यास मानवी शरीर व्यायामाला कसा प्रतिसाद देतो हे समजून घेण्यास मदत करू शकतो.

4/8

नियमित कमी कालावधीचा व्यायाम

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

नियमित कमी कालावधीचा व्यायाम एक किंवा दोन मोठ्या प्रशिक्षण सत्रांपेक्षा अधिक फायदेशीर आहे, असे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटी (ECU) मधील अभ्यासाचे नेते प्रोफेसर केन नोसाका सांगतात.

5/8

जड डंबेलसह बायसेप्स

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

युरोपियन जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सहभागींनी जड डंबेलसह तीन-सेकंद बायसेप्स केले.

6/8

आठवड्यातून 2 नव्हे 5 दिवस व्यायाम

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

नवीन अभ्यासात, सहभागींना दोन गटांमध्ये विभागले गेले, पहिल्या गटाने आठवड्यातून दोन दिवस तीन-सेकंद व्यायाम केला. तर दुसरा गट आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करायचा. 4 आठवड्यांनंतर, संशोधकांनी सहभागींच्या बायसेप्सची तुलना केली. 

7/8

स्नायूंमध्ये लक्षणीय बदल

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

आठवड्यातून दोनदा व्यायाम करणाऱ्यांमध्ये कोणतेही लक्षणीय बदल दिसून आले नाहीत. मात्र तीन दिवस व्यायाम करणाऱ्या गटात लक्षणीय वाढ दिसून आली. असे असले तरी आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करणाऱ्यांच्या स्नायूंमध्ये लक्षणीय बदल दिसला.

8/8

आठवड्यातून 3 दिवस व्यायाम

Health Tips How many days a week exercise is important for a healthy life

या सर्वांचा एक निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार निरोगी आयुष्यासाठी आठवड्यातून 3 दिवस व्यायाम करणे आवश्यक आहे. आठवड्यातून 5 दिवस असे केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे सांगण्यात आले आहे.