Drinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य

Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या. 

Surendra Gangan | Nov 02, 2022, 09:28 AM IST
1/5

सकाळी रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. असे केल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. तुम्ही याला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवावे.

2/5

जे लोक ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पितात, त्यांची पचनक्रिया मजबूत असते. याशिवाय त्यांच्या तोंडात घाणेरडे बॅक्टेरियाही जमा होत नाहीत.

3/5

ब्रश न करता सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ज्या लोकांना सर्दी जास्त आहे आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांनी रोज ब्रश न करता पाणी प्यावे.

4/5

ब्रश न करता सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे तुमची स्कीन चांगले राहते. तसेच केसांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.  त्यामुळे रोज ब्रश न करता पाणी पिणे आवश्यक आहे.

5/5

ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे त्यांनी ब्रश न करता पाणी प्यावे. ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने चरबी कमी होते.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)