गावापासून शहरापर्यंत 'या' आहेत 5 बेस्ट बाईक्स, किंमत फक्त...

आज आम्ही तुम्हाला गावापासून शहरापर्यंत सर्वत्र प्रचलित असणाऱ्या 5 बाईक्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांची किंमत कमी आणि मायलेज जास्त आहे. 

| Aug 22, 2024, 12:52 PM IST
1/6

कमी किंमत

भारतीय बाजारपेठेत सध्या सर्वात कमी किंमतीच्या बाईक आणि चांगले मायलेज तसेच कमी देखभाल असणाऱ्या बाईकसाठी मोठी मागणी आहे. 

2/6

हिरो HF100

हिरो HF100 आणि HF Deluxe असे दोन मॉडेल आहेत. या 100 CC बाईकची सुरुवातीची किंमत 59.018 रुपये आहे. ही बाईक 70 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते. 

3/6

स्प्लेंडर प्लस

स्प्लेंडर प्लस ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. या 97.2 cc बाईकची किंमत 76,306 रुपये आहे. ही बाईक 70 किमी/लिटर पर्यंत मायलेज देखील देते.

4/6

बजाज प्लेटिना 100

बजाज प्लेटिनामध्ये 102 cc इंजिन आहे. या बाईकची किंमत 68,685 रुपयांपासून सुरु होते. ही 117 किलो वजनाची बाईक 70-75 किमी/लिटर मायलेज देते. 

5/6

TVS स्पोर्ट

TVS स्पोर्टमध्ये 109 cc चे इंजिन आहे. या बाईकची किंमत 59,881 रुपयांपासून सुरु होते. ही बाईक 80 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते. या बाईकचे वजन 112 किलो आहे. 

6/6

होंडा शाइन

स्प्लेंडरनंतर ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. 123 cc इंजिन असलेल्या या बाईकची किंमत 80,250 रुपयांपासून सुरु होते. ही बाईक 55-60 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते.