Holi 2024 : सुख समृद्धीसाठी होलिका दहनाच्या मुहूर्त चुकवू नका! या उपायांमुळे होतील सर्व इच्छा पूर्ण

Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं आपलं असं वैशिष्ट्य आहे. होळीचा सण हा वाईटवर चांगल्याचा विजय आहे. अशा या होळी सणाच्या एक दिवस आधी पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यादिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. 

Mar 16, 2024, 12:31 PM IST
1/7

अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. लहान मुलांमध्ये होळीचा उत्साह दिसून येतोय. यंदा होलिका दहन 24 मार्चला तर 25 मार्चला होळीचा सण साजरा होणार आहे. 

2/7

तुम्हाला घरात सुख समृद्धी हवी असेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे असं वाटत असेल तर होलिका दहनचा मुहूर्त चुकवू नका. ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. 

3/7

घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण राहवं म्हणून होळीच्या दिवशी घरात एक रोप लावा. तुम्ही तुळशीचं रोपही लावू शकता. 

4/7

घरात समृद्धी आणि धनसंपदा नांदावी म्हणून होळीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधा यांचं चित्र घरी आणा. 

5/7

श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं. ज्या घरात श्रीयंत्र असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो. म्हणून होळीच्या शुभ मुहूर्तावर घरात श्रीयंत्राची स्थापना करा. 

6/7

व्यवसायात प्रगतीसाठी होळीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जा. देवासमोर उदबत्ती, दिवा लावा आणि सोबत ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर देवाला गूळ अर्पण करुन तो प्रसाद म्हणून वाटप करा. 

7/7

तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळीच्या दिवसापासून ॐ हर त्रिपुरहर भवानी बाला, राजा मोहिनी सर्व शत्रु । विंध्यवासिनी मम चिन्तित फलं, देहि देहि भुवनेश्वरी स्वाहा या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा.(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)