होळीमुळे तब्बल इतक्या किंमतीला विकलं जातंय स्पेशल ट्रेनचं तिकीट, ऐकून व्हाल हैराण
Holi Train Travel: होळीचा सण मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची जशी रिघ लागलेली असते तशी यूपी, एमपीला जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळते.
Holi Train Travel: लखनौ-मुंबई रेल्वेचे तिकीट तब्बल 4385 रुपयांना विकले गेले. तर मुंबईला जाण्यासाठी नॉनस्टॉप फ्लाइटचे तिकीट फक्त 4 हजार 999 रुपयांना बुक करण्यात आले होते.
1/9
बापरे! होळीमुळे स्पेशल ट्रेनचं तिकीट विमानाच्या तिकीटहून जास्त, किंमत ऐकून व्हाल हैराण
होळीचा सण मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची जशी रिघ लागलेली असते तशी यूपी, एमपीला जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळते. गर्दीमुळे लखनौहून मुंबईला येणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये कन्फर्म सीटसाठी स्पर्धा पाहायला मिळाली. यावेळी प्रवाशांना महागड्या स्पेशल ट्रेन तिकीट घेऊन प्रवास करावा लागला.
2/9
नॉनस्टॉप फ्लाइटचे तिकीट
3/9
महागड्या तिकिटांवर प्रवास
आज सोमवारी देशभरात होळीचा सण उत्सहात साजरा केला जाणार आहे. लखनौहून दिल्ली आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाड्यांमध्ये कन्फर्म सीटसाठी स्पर्धा सुरु आहे. साद्या गाड्या फूल असून विशेष गाड्यांमध्ये जागा रिक्त आहेत. असे असले तरी महागड्या रेल्वे भाड्यांमुळे बहुसंख्य प्रवाशी बुकिंग करताना हात मागे घेत आहेत. असे असताना शनिवारी प्रवाशांना महागड्या तिकिटांवर प्रवास करावा लागला.
4/9
तरीही जागा रिकामी
गाडी क्रमांक 01104 गोरखपूर मुंबई विशेष ट्रेन 7.55 वाजता सुटली. या ट्रेनमधील फर्स्ट एसी तिकीट 4385 रुपयांना विकले गेले. तर सेकंड एसी तिकीट 2760 रुपये, थर्ड एसी इकॉनॉमी क्लासचे तिकीट 1880 रुपये आणि स्लीपर तिकीट 780 रुपयांना विकले गेले. मात्र, तिकीटांची विक्री झाल्यानंतरही जागा रिकाम्या राहिलेल्या दिसून आल्या.
5/9
विमानाच्या तिकीटीप्रमाणे
प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटांवर विमान भाड्याइतकाच खर्च करावा लागत होता. एअर इंडियाच्या IX 1785 फ्लाइटचे तिकीट शनिवारी रात्री 8.10 वाजता 4,999 रुपयांना विकल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे नॉनस्टॉप फ्लाइट रात्री 10.30 वाजता अमौसीला पोहोचले. तर इंडिगोची नॉनस्टॉप फ्लाइट 6E-5141 रात्री 10.10 वाजता निघाली. त्याचे तिकीट 5034 रुपयांना विकले गेले.
6/9
महागड्या स्पेशल ट्रेनमध्येही बुकिंग
या महागड्या स्पेशल ट्रेनमध्येही बुकिंग केले जाते रविवारी जाणाऱ्या गोरखपूर पुणे स्पेशल (01432) चे थर्ड एसी तिकीट 2 हजार 70 रुपये, गोरखपूर एलटीटी स्पेशल (01124) सेकंड एसी तिकीट 2 हजार 735 रुपये आणि थर्ड एसी तिकीट 1 हजार 970 रुपये, गोरखपूर मुंबई स्पेशल (01084) थर्ड एसी तिकीट 1 हजार 958 रुपये मोजण्यात आले आहेत.
7/9
अनेक जागा रिक्त
8/9
1,440 रुपये भाडे
9/9