जुलैत तब्बल महिन्यात 12 दिवस बंद असणार बॅंका!
जुलै महिना सुरुच होणार आहे. भारतीय रिजर्व बॅंकनं जुलै महिन्याच्या बॅंकच्या सुट्यांची यादी जाहिर केली आहे. या लिस्टनुसार, जुलैमध्ये जवळपास 12 दिवस बॅंक बंद असणार आहे. जुलै महिन्यात गुरु हरगोविंद जी जयंती आणि मोहरमच्या निमित्तानं बॅंक बंद असणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी बॅंकेची सुट्टी असेल. जुलैमध्ये बॅंक हॉलिडे जवळ-जवळ प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी असते. अशात बॅंकेत जाण्याआधी एकदा बॅंक हॉलिडेच्या निमित्तानं तपासायला हवं, कारण यामुळे तुमचा वेळ वाचेल.