ऑरीनं 23 किलो वजन कसं कमी केलं? आहारातून काढून टाकले 'हे' पदार्थ

सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी हा नेहमीच चर्चेत असतो. पण सुरुवातीला पाहिलेला ऑरी आणि आताच्या ऑरीमध्ये खूप फरक आहे. ऑरीनं तब्बल 23 किलो वजन हे कमी केलं आहे. त्यासाठी त्यानं त्याच्या आहारातून 10 पदार्थ हे काढून टाकले आहेत. 

| Oct 24, 2024, 16:12 PM IST
1/8

सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि असे पदार्थ ज्यांच्यात रिफाईन्ड साखर असते. फ्लेवर्ड वॉटर किंवा आइस्ड टी हे पदार्थ त्यानं टाळले. 

2/8

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टमध्ये खाण्यात येणारे सेरेल्स जे आरोग्यासाठी चांगले असल्याचं म्हणतात त्यातही साखरेचे प्रमाण हे जास्त असते. मुसेली आणि सेरेल बार्समध्ये ही साखर असते.   

3/8

सॉस

कोणत्याही प्रकारचे सॉस मग केचअप, बारबेक्यू सॉस, सॅलेड ड्रेसिंग यामध्ये देखील साखरेचं प्रमाण जास्त असतं ते देखील त्यानं खाणं टाळलं. 

4/8

व्हाईट ब्रेड

रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स अर्थात व्हाईट ब्रेड, पास्ता यात ग्लुकोजचं प्रमाण खूप जास्त असतं. 

5/8

फळांचे ज्युस

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्यात फायबर असतात पण अनेक फळांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.   

6/8

थंड पदार्थ

थंड पदार्थ अर्थात आईस्क्रिम किंवा फ्रोजन योगर्ट या सगळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. 

7/8

पॅक्ड स्नॅक्स

चिप्सस, प्रोटिन बार अशा वेगवेगळ्या गोष्टीं जरी त्यांना हेल्दी आणि ऑरगॅनिक म्हणत असलं तरी त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. 

8/8

बेक्ड पदार्थ

बेक्ड पदार्थ म्हणजे केक, कूकी, मफीन्स किंवा मग पेस्ट्री या सगळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. सर्वसामान्यांनप्रमाणे ऑरी देखील घरचं जेवण करतो.