Indian Railway : हे इंजिन कसलं आहे मालगाडी की प्रवासी, तुम्हाला माहितीये का फरक?
Railway Train Engine: आपण कोणतीही ट्रेन पाहिली की आपल्याला प्रश्न असतो की ही नक्की एक्सप्रेस आहे की नक्की मालगाडी? पण आता तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे. इंजिनवर लिहिलेल्या काही शब्दांच्या मदतीनं आपण लगेच ओळखू शकतो की ते नक्की पॅसेंजर ट्रेनचे इंजिन आहे की मालगाडीचे इंजिन. इंजिन ज्या प्रकारे बनवण्यात येते त्यावर असते. त्यावरून ठरवलं जातं की इंजिन हे एकूण किती वजन घेऊन जातं. चला तर जाणून घेऊया त्याविषयी...
1/5
2/5
भारतीय रेल्वेच्या इंजिनमध्ये काही अक्षरे लिहिलेली असतात. यामध्ये WAG, WAP, WDM, WAM अशी अक्षरे लिहिली जातात. यावरून ठरवलं जातं की हे इंजिन किती वजन घेऊन जाऊ शकतं. 'W' म्हणजे पाच फूट असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या गेजशी संबंध आहे. 'A' म्हणजे पॉवरचा स्त्रोत म्हणजे वीज आणि जर 'D' असेल तर त्याचा अर्थ ही ट्रेन डिझेलवर चालते.
3/5
4/5