'..तर मानसिक त्रास होतो', रश्मिका स्पष्टच बोलली! Success बद्दल म्हणते, 'माझ्यापेक्षा सुंदर..'

Rashmika Mandanna Talking About Success: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मागील काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सतत्याने चर्चेत आहे. तिने मागील दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदीत चांगलाच जम बसवला आहे. अनेकज तिला नॅशनल क्रशही म्हणतात. मात्र आपल्याला मिळालेल्या या यशाकडे पाहण्याचा तिचा वेगळाच दृष्टीकोन आहे. तिने यासंदर्भात नुकतच भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात... 

Swapnil Ghangale | Apr 16, 2024, 15:30 PM IST
1/8

Rashmika Mandanna On Success

अभिनेत्री रश्मिका मंधाना सध्या चर्चेत आहे ती पुष्पा-2 चित्रपटाच्या पोस्टरमुळे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या हरहुन्नरी अभिनेत्रीने तिचा मनोरंजन सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे यासंदर्भात भाष्य केलं. मला मिळालेलं यश हे मी कधीच हलक्यात घेत नाही असं रश्मिकाने म्हटलं आहे.  

2/8

Rashmika Mandanna On Success

माझ्यापेक्षा अधिक टॅलेंटेड आणि सुंदर अनेकजण आजूबाजूला असल्याची जाणीव मला आहे, असंही रश्मिका म्हणाली. आपल्याला जी काही संधी मिळाली आहे त्याचा सर्वोत्तम वापर करण्याचा मी कायमच प्रयत्न करत असते असंही रश्मिकाने म्हटलं आहे.

3/8

Rashmika Mandanna On Success

"मला ठाऊक आहे की माझ्यापेक्षा फार सुंदर दिसणाऱ्या, माझ्याहून अधिक कौशल्य असलेल्या आणि टॅलेंटेड मुली आजूबाजूला आहेत. मात्र मी आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहचण्यासाठी मला वेळोवेळी संधी मिळत गेली आणि त्यासाठी मी कायमच सर्वांची ऋणी राहील," असं रश्मिका म्हणाली.

4/8

Rashmika Mandanna On Success

"आयुष्यातील कोणताच आनंद किंवा करिअरमध्ये मिळालेलं यश हलक्यात घेता कामा नये, हे मी मागील काही वर्षांमध्ये शिकले आहे," असंही रश्मिकाने म्हटलं आहे.  

5/8

Rashmika Mandanna On Success

'लाइफस्टाईल एशिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रश्मिकाने आपण प्रसिद्धी झोतात आल्यापासून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी बरोबर आणि चूक या दृष्टीकोनातून पाहिलं जातं असंही रश्मिका म्हणाली. मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर अशा गोष्टी होणं स्वाभाविक असल्याचंही ती म्हणाली.

6/8

Rashmika Mandanna On Success

मात्र मनोरंजनसृष्टीमध्ये टिकून राहायचं असेल तर तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही खंबीरपणे सामोरे जाणं गरजेचं आहे, असंही रश्मिका म्हणाली.  

7/8

Rashmika Mandanna On Success

"तुम्ही बोललात तर जग तुमचं ऐकतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतं. त्यावर टीका करतं. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटतात. ही फार सामान्य बाब आहे. मात्र तुम्ही या टीकेसंदर्भात गेंड्याच्या कातडीचे नसाल (खंबीर नसाल) तर तुम्हाला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या फार त्रास होतो. याबद्दल लोकांना फारशी कल्पना नसते," असं रश्मिका म्हणाली.

8/8

Rashmika Mandanna On Success

रश्मिका सध्या तेलगु आणि हिंदी चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सध्या ती सुकुमारच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटामध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारत असून त्याचं शुटींग सुरु आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.