1/5
तिकीट रद्द केल्यावर IRCTC तात्काळ देणार रिटर्न
![तिकीट रद्द केल्यावर IRCTC तात्काळ देणार रिटर्न तिकीट रद्द केल्यावर IRCTC तात्काळ देणार रिटर्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/12/761671-irctc30-5.jpg)
आयआरसीटीसीचा हा उपक्रम ट्रेन तिकिटांच्या इतिहासातील एक मोठा बदल मानला जातोय. कारण जे सर्व प्रवासी तिकीट रद्द करतात, त्यांचे पैसे काही दिवस उशीरा मिळतात. पण आता असे होणार नाही. आयआरसीटीसीच्या आयपी गेटवेमध्येही बरीच वैशिष्ट्ये आहेत. गाडीचे तिकिट देखील ऑटो पेच्या सुविधेसह तात्काळ बुक केले जाईल. कारण यामुळे पेमेंट वेगवान होते. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यताही वाढेल आणि त्यांचा बराच वेळ वाचणार आहे.
2/5
IRCTC-iPay चा वापर कसा होणार ?
![IRCTC-iPay चा वापर कसा होणार ? IRCTC-iPay चा वापर कसा होणार ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/12/761661-irctc30-2.jpg)
तुम्हाला तिकिट रद्द झाल्यावर त्वरित परतावा देखील हवा असेल तर या सुविधेमध्ये तुमच्या यूपीआय बँक खात्यातून किंवा देय देण्याच्या अन्य माध्यमांमधून डेबिटसाठी परवानगी फक्त एकच वेळ द्यावी लागेल. पुन्हा तेच पेमेंट इन्स्ट्रुमेंट पुढील व्यवहारांसाठी अधिकृत होईल. जेव्हा आपण तिकिट रद्द कराल तेव्हा आपल्या खात्यात परतावा जमा होईल.
3/5
आतापर्यंत रिफंडला वेळ का लागायचा ?
![आतापर्यंत रिफंडला वेळ का लागायचा ? आतापर्यंत रिफंडला वेळ का लागायचा ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/12/761662-irctc30-3.jpg)
आतापर्यंत, जर प्रवाशाने रेल्वेचे तिकीट बुक केले असेल आणि इतर कोणत्याही कारणास्तव कन्फर्म तिकीट मिळालं नसेल किंवा तिकिट रद्द झालं नसेल तर रिफंड मिळण्यास 1-2 दिवस लागत. कारण आतापर्यंत आयआरसीटीसीने बँकांच्या गेटवेचा वापर केला होता. त्यामुळे रिफंडला उशीर लागत होता. परंतु आता आयआरसीटीसीने आपली वेबसाइट अपग्रेड केली. तसेच त्याचा पेमेंट गेटवे आयआरसीटीसी-आयपी सुरू केला आहे.
4/5
तत्काळ तिकीट बुक करणं होणार सोपं
![तत्काळ तिकीट बुक करणं होणार सोपं तत्काळ तिकीट बुक करणं होणार सोपं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/12/761664-irctc30-4.jpg)
5/5
आत्मनिर्भर भारत अंतर्गत सुरुवात
![आत्मनिर्भर भारत अंतर्गत सुरुवात आत्मनिर्भर भारत अंतर्गत सुरुवात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/12/761666-irctc31-new.jpg)