धक्कादायक |TikTok, Instagram वर लाखोजण करायचे फॉलो, १८ व्या वर्षात केली आत्महत्या

Feb 12, 2021, 11:50 AM IST
1/5

इंस्टाग्राम व्हिडीओवर कॅप्शनमध्ये शेवटचा मेसेज

इंस्टाग्राम व्हिडीओवर कॅप्शनमध्ये शेवटचा मेसेज

टिकटॉक स्टार झझरिया क्विंटने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला 'ही माझी शेवटची पोस्ट आहे' असे कॅप्शन दिले. डझरिया डी म्हणून ती प्रसिद्ध होती. आणि अमेरिकेतील लुझियाना राज्यातील बॅटन रॉगमध्ये ती राहत होती.

2/5

घरात फाशी घेऊन आत्महत्या

घरात फाशी घेऊन आत्महत्या

डीने आधी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती बरीच आनंदी दिसतेय. ती गाताना आणि नाचताना दिसतेय. मात्र, कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मला माहित आहे की मी खूप अजित आहे. आणि ही माझी शेवटची पोस्ट आहे. यानंतर तिच्या आई-वडिलांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या मृत्यूची माहिती दिली.

3/5

मिलियनहून अधिक फॉलोवर्स

मिलियनहून अधिक फॉलोवर्स

डझारिआ टिकटॉक वर Bxbygirlldee यूजर नेमने एक्टिव होती. तिचे टीकटॉकवर मिलिअन्सहून अधिक फॉलोअर्स होते. ती एक ब्यूटी शॉप चालवायची आणि तिचे इंस्टाग्रामवर 1 लाख 12 हजारहून जास्त फॉलोअर्स होते. इतकंच नव्हे तर युट्यूबवर देखील तिचे अनेक चाहते होते. ती युट्यूबवर वायरल चॅलेंजचे व्हिडीओ टाकायची.

4/5

फॉलोवर्सना दु:ख अनावर

फॉलोवर्सना दु:ख अनावर

तिच्या फॉलोअर्सनी यूट्यूब अकाऊंटवर खूप इमोशनल कमेंट्स केल्या आहेत. तू माझी आवडती युट्यूबर आणि टीकटॉकर होतीस असे एका युजरने म्हटलंय, तू निघून गेलीस याचं मला खूप वाईट वाटत आहे. माझं काळीज पिळवटणारी घटना आहे. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, तुझ्या आयुष्यातील गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

5/5

वडिलांनी म्हटलं, मुलीने भावना शेअर केल्या असत्या तर..

वडिलांनी म्हटलं, मुलीने भावना शेअर केल्या असत्या तर..

डेली मेलच्या वृत्तानुसार, तिच्या वडिलांनी गोफंडमी वेबसाइटवर एक पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या मुलीच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते हे तिने माझ्याशी व्यक्त करायला हवं होतं.