रोज रात्री 'हा' खेळाडू मला रुममध्ये त्रास देतो; शुभमन गिलचा खुलासा, थेट रोहित शर्माकडे तक्रार

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडविरोधात द्विशतक ठोकत शुभमन गिलने क्रिकेटविश्वाला आपली नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. गिलने सलग तीन षटकार ठोकत द्विशतक साजरं केलं. गिल सर्वात कमी वयात द्विशतक ठोकणार क्रिकेटर ठरला आहे. मात्र या खेळीनंतर गिलने एक खुलासा केला आहे  

Jan 20, 2023, 17:20 PM IST
1/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

शुभमन गिलने न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 208 धावांची जबरदस्त खेळी केली आहे. एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा शुभमन गिल भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. Photo - AP  

2/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

शुभमन गिलने हैदराबादमधील एकदिवसीय सामन्यात 149 चेंडूंमध्ये 19 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 208 धावा ठोकल्या. या सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. शुभमन गिल वगळता एकही भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या करु शकला नाही. Photo - AP  

3/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

गिलने न्यूझीलंडविरोधात द्विशतक ठोकत कर्णधार रोहित शर्मा आणि सहकारी ईशान किशन यांच्यासह स्थान मिळवलं आहे. द्विशतक ठोकत गिलने ईशान किशनचा सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. Photo - AP  

4/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

गिलने सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्याशी बोलताना एक मोठा खुलासा केला. भारतीय संघातील एक खेळाडू रात्री आपल्याला त्रास देतो अशी तक्रारच गिलने रोहित शर्माकडे केली. Photo - AP  

5/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

गिलने रोहित शर्माला सांगितलं की, आपला रुममधील सहकारी ईशान किशन रोज रात्री मोठ्या आवाजात चित्रपट पाहत असतो. यामुळे आपल्याला चांगली झोप मिळत नाही आणि संपूर्ण वेळापत्रक बिघडतं. Photo - AP  

6/6

Indian Cricketer Shubhman Gill reveals Ishan Gil watches film in loud noise disturbs time table

यावेळी ईशाननेही गिलच्या आरोपावर उत्तर देत सांगितलं की, तो मोठ्या आवाजात इअरफोन न लावता चित्रपट पाहतो. आता आपल्यासोबत कोणी रुम शेअर करत असेल तर त्याला हे भोगावंच लागेल. रोहित शर्माने यावेळी गिल आणि शुभमन चांगले मित्र असून दोघांमध्ये अशी मस्करी सुरु असते असं सांगितलं.  Photo - AP