दिवाळीनिमित्त मुंबई, पुण्यातून 154 अतिरिक्त विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 154 अतिरिक्त सेवा सुरु करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Sep 23, 2024, 16:22 PM IST

Diwali Special Train:प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 154 अतिरिक्त सेवा सुरु करण्यात आली आहे.

1/7

दिवाळीनिमित्त मुंबई, पुण्यातून 154 अतिरिक्त विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

Diwali Special Train: येत्या काही दिवसांत येणारे दिवाळी, छठ पूजा हे सण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या सणासाठी  मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येने लोकं आपल्या गावाकडे जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 154 अतिरिक्त सेवा सुरु करण्यात आली आहे.

2/7

सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या 8 फेऱ्या असतील. ही ट्रेन 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालाधीत प्रत्येक गुरुवारी रात्री 12.20 ला सीएसएमटीहून रवाना होईल. त्याच दिवशी दुपारी सीएसएमटी, कोल्हापूरला पोहोचेल. या गाडीला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज हे स्टॉप आहेत. 

3/7

सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेनच्या 8 सेवा असतील. ही ट्रेन 18 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री 12.20 वाजता सीएसएमटी, मुंबईहून रवाना होईल आणि त्याच दिवशी 11.40 वाजता लातूरला पोहोचेल. 

4/7

सीएसएमटी-आगरतळा साप्ताहिक स्पेशल

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

सीएसएमटी-आगरतळा साप्ताहिक स्पेशलच्या 4 फेऱ्या असतील ही ट्रेन 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी रात्री 11.05 वाजता सीएसएसटी, मुंबईतून रवाना होईल. रविवारी 1.10 वाजता आगरतळाला पोहोचेल. 

5/7

एलटीटी-करीमनगर साप्ताहिक स्पेशल

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

एलटीटी-करीमनगर साप्ताहिक स्पेशलच्या 4 फेऱ्या असतील. 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी एलटीटी, मुंबई येथून दुपारी 3.30 वाजता निघेल. पुढच्या दिवशी 8.30 वाजता करीमनगरला पोहोचेल.

6/7

एलटीटी सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल ट्रेन

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

एलटीटी सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या 8 फेऱ्या असतील. 18 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत दर शुक्रवारी एलटीटी मुंबईहून सकाळी 8.20 वाजता सुटेल. त्याच दिवशी 11 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. 

7/7

एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष

Indian Railways Diwali Special Train time table Marathi News

या गाडीच्या 8 सेवा असतील. ही स्पेशल ट्रेन 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता एलटीटी, मुंबईहून रवाना होईल. पुढच्या दिवशी 8.45 ला कोचेवुलीला पोहोचेल.